रणजी ट्रॉफी / मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉने प्रथम श्रेणीत पहिल्यांदाच ठोकले दुहेरी शतक

मुंबईच्या पृथ्वी शॉने 202 धावा काढल्या; बडोद्याला 534 धावांचे लक्ष्य

प्रतिनिधी

Dec 12,2019 09:05:12 AM IST

वडोदरा : मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉने करिअरमध्ये पहिल्यांदा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावले. पृथ्वीने बडोद्याविरुद्ध २०२ धावांची खेळी केली. त्याच्या दुहेरी शतक व सूर्यकुमार यादवच्या (१०२*) शतकाच्या जोरावर मुंबईने दुसऱ्या डावात ४ बाद ४०९ धावांवर डाव घोषित केला. बडोद्याने लक्ष्याचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसअखेर ७४ धावांवर ३ गडी गमावले होते. दिवसअखेर अभिमन्यूसिंग राजपूत (१६) खेळत आहे. मुंबईने पहिल्या डावात ४३१ धावा काढल्या. दुसरीकडे, बडोद्याने पहिल्या डावात सलामीवीर केदार देवधरच्या नाबाद १६० धावांच्या मदतीने ३०७ धावा उभारल्या. दुसऱ्या डावात मुबईच्या पृथ्वीने १७९ चेंडूत १९ चौकार व ७ षटकारांसह २०२ धावा केल्या. पृथ्वी व जय बिस्ताने (६८) पहिल्या गड्यासाठी १९० धावांची भागीदारी केली.


यादरम्यान, चंदिगडने अरुणाचल प्रदेशला रणजी ट्रॉफी प्लेट गटातील सामन्यात तिसऱ्या दिवशी बुधवारी डाव व १७३ धावांनी हरवले. चंदिगडच्या गुरिंदर सिंगने ६ विकेट घेतल्या. अरुणाचलने दुसऱ्या दिवशी ६ बाद १६४ धावा काढल्या. तिसऱ्या दिवशी ४ गडी १२ धावांत गमावले. सौराष्ट्रने १६२ धावांचे सोपे लक्ष्य तिसऱ्या दिवशी ५ बाद १६५ धावा करत गाठले.

X
COMMENT