आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prithviraj Chavan's Nomination Against Udayan Raje In The By elections In Satara?

लोकसभा पोटनिवडणूकीत लढवण्याची माझी इच्छा नाही, कराडमधूनच विधानसभा लढवणार- पृथ्वीराज चव्हाण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यापूर्वी त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी काही अटींसोबत भाजपमध्ये प्रवेश केला, त्यात साताऱ्याची पोटनिवडणूक आगामी विधानसभा निवडणुकीसोबतच होईल ही अट त्यांनी घातली आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीसोबत साताऱ्याची खासदारकीची पोटनिवडणुकही होणार असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत त्यांच्या विरुद्ध काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांना उतरवणार असल्याची चर्चा रंगली होती, पण स्वतः पृथ्वीराज चव्हाणांनी या बातम्यांचे खंडन केले आहे.

मागील दोन टर्मला आणि आता 2019 च्या लोकसभेला विजय मिळवलेल्या उदयनराजेंची आपल्या मतदारसंघात चांगलीच ताकद आहे. त्यामुळे त्यांचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी मोठी रणनिती आखली आहे. साताऱ्याची पोटनिवडणूक राष्ट्रवादीने काँग्रेससाठी सोडली आहे, त्यामुळे उदयनराजेंविरुद्ध काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात होते, पण या सर्व चर्चांना स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांनी पूर्ण विराम लावला आहे. "लोकसभा पोटनिवडणुकीत लढवण्याची माझी इच्छा नाही, कराडमधूनच विधानसभा लढवणार" अशी प्रतिक्रीया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.बातम्या आणखी आहेत...