आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prithviraj Kapoor Was Nehruji's Favorite, Some Incidents Telling About There Special Friendship

संसदेत पाऊल ठेवणारे पहिले बॉलिवूड स्टार होते पृथ्वीराज कपूर, नेहरूजींचे होते आवडते, नेहरूजी म्हणायचे - 'तू सोबत असशील तर हिम्मत मिळते'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहर नेहरू यांचे निधन होऊन आता 55 वर्षे झाली आहेत. त्यांचे निधन 27 मे 1964 ला झाले होते.  पंडितजींच्या फिल्म इंडस्ट्रीशी निगडित काही आठवणी आहेत. विशेषतः हिंदी सिनेमाचे दिग्गज अभिएंटे राहिलेले पृथ्वीराज कपूर त्यांचे खास मित्र मानले जायचे. कपूर संसदेत पाय ठेवणारे पहिले बॉलिवूड स्टार होते. ते केवळ कांग्रेसीच नव्हते, तर नेहरूजींच्या विश्वासातीलही होते. विशेषतः आपले सपोर्टर असूनही नेहरूजींनी कधीच कपूर यांना स्वतंत्रता नायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कौतुक करण्यापासून रोखले नाही. पृथ्वीराज यांनी नेताजींच्या इंडियन नॅशनल आर्मीसाठी फंडदेखील जमा गेला होता.  

 

नेहरूजींना एखाद्या गोष्टीसाठी नकारही द्यायचे कपूर... 
बॉलिवूड स्टार पावर इन इंडियन पॉलिटिक्सनुसार, अनेकदा असेही व्हायचे की, पृथ्वीराज कपूर नेहरूजींना नकार द्यायलाही कचरत नसत. एकदा पंडितजींना त्यांना भेटायचे होते. त्यांनी एका अधिकाऱ्याला पृथ्वीराज कपूर यांना डिनरसाठी आणायला पाठवले. पण कपूर यांनी हे सांगून जायला नकार दिला की, ते आपल्या थिएटर टीमसोबत आहेत. नेहरूजींना स्वतःलाही स्टेज आणि फिल्मची आवड होती, त्यामुळे त्यांनी कपूर आणि त्यांच्या थिएटर टीमला पुढच्या दिवशी आमंत्रित केले. 60 लोकांचा पूर्ण ग्रुप, (ज्यामध्ये कलाकार, संगीतकार आणि स्टेज बनवणारे कारपेंटर्सदेखील सामील होते) नवी दिल्लीच्या तीन मूर्ती भवन येथील पंतप्रधान आवासमध्ये पोहोचले आणि नेहरूजींच्या प्रायव्हेट डायनिंग रूममध्ये डिनर केला. नेहरूजींनी स्वतः त्यांना संपूर्ण आवास दाखवले आणि म्यूझियमसोबत ते गिफ्ट्सदेखील दाखवले, जे त्यांना गणमान्य लोकांकडून मिळाले होते.  

 

नेहरूजी म्हणायचे - तू सोबत असशील तर हिम्मत मिळते... 
पुस्तक नेता-अभिनेता... मध्ये नाव ना लिहिता पृथ्वीराज कपूर यांच्या कजिनकडून मिळालेल्या माहितीनुसार लिहिले आहे की, नेहरूजींसोबत त्यांची खास बॉन्डिंग होती. कजिननुसार, "मी चोरून नेहरूजींसोबत पापाजीला (पृथ्वीराज कपूर) हे सांगताना ऐकले होते की, तू माझ्या सोबत चालत असलास की, मला एक प्रकारची हिम्मत मिळते."

 

जेव्हा कपूर यांनी ठोकरली परदेशी टूरची ऑफर... 
अभिनेत्री जोहरा सहगल यांनी आपल्या बुक 'स्टेजेस : दि आर्ट अंद एडवेंचर्स ऑफ जोहरा सहगल' मध्ये लिहिले आहे की, नेहरूजी अनेकदा कपूरजींना परदेशी जाणाऱ्या सांस्कृतिक प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करण्यासाठी विचारायचे. त्यांच्यानुसार, "एकदा टूर खूप जवळ होता, त्यामुळे कपूरजींनी नेहरूजींची रिक्वेस्ट मानण्यास नकार दिला. सांगितले जाते की, नेहरूजींनी आपली भूमिका न घेतल्यामुळे त्यांना फटकारले देखील होते. कपूर म्हणाले होते, 'मला माहित आहे, अजूनही कुणी आहे, जे समजून घेत नाहीये.' जेव्हा पंडितजींनी विचारले - कोण ? तर कपूरजिन्नी उत्तर दिले - तुम्ही.'