आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे-मुंबई महामार्गावर अपघात, 60 फुट दरीत कोसळली बस; 5 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा घाटात एक खासगी बस 60 फुट दरीत कोसळळी. भल्या पहाटे झालेल्या या बस अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातात इतर 25 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खोपोली, लोणावळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खोपोली पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी बस कराड येथून मुंबईकडे निघाली होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा घाटात अंडा पाँइंटच्या वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि बस सुमारे साठ फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये 49 प्रवासी होते. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, बचावासाठी स्थानिकांनी मदत केली. त्यांच्याच साह्याने जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...