Invention / अमेरिकी कंपनी लिफ्टने तयार केले खासगी मल्टिकॉप्टर, परवान्याशिवाय घेता येईल भरारी

याचा वापर अनेक मेट्रो शहरातील बाहेरील परिसर, पर्यटन स्थळ आणि मनोरंजनाचे केंद्र असलेल्या ठिकाणी करण्याची योजना

दिव्य मराठी

Jul 13,2019 09:49:00 AM IST

लागो विस्ता - एअरक्राफ्ट व्यवस्थापन कंपनी लिफ्टने खासगी मल्टिकॉप्ट हेक्साचे प्रॉडक्शन मॉडेल तयार केले आहे. या सिंगल सीटर ड्रोन एअर क्राफ्टचा ज्यांच्याकडे एअरक्राफ्ट उडवण्याचा परवाना नाही असे नागरिकही वापरू शकता. कंपनी याचा वापर अनेक मेट्रो शहरातील बाहेरील परिसर, पर्यटन स्थळ आणि मनोरंजनाचे केंद्र असलेल्या ठिकाणी करण्याची योजना तयार करत आहे. या माध्यमातून उड्डाण घेण्याआधी कंपनीच्या वतीने युजरला व्हर्च्युअल सिम्युलेटरमध्ये काही मिनिटांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

X