आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Revenge: 9 वीतल्या मुलीला सिनेमा दाखवला, मग निर्जनस्थळी नेऊन केला खून; या गोष्टीचा होता राग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीतील एका खासगी शाळेत 9 वीला शिकणाऱ्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आरोपीने तिला सुरुवातीला एका मॉलमध्ये चित्रपट दाखवण्यासाठी बोलावले. यानंतर एका निर्जनस्थळी नेले आणि तिची हत्या केली. घराबाहेर पडण्यापूर्वी पीडितेने आपल्या कुटुंबियांना मित्रांसोबत बाहेर जात असल्याचे सांगितले होते. परंतु, रात्री उशीरापर्यंत घरी पोहोचली नाही, तेव्हा पोलिसांत तक्रार करण्यात आली. सुरुवातीला कुटुंबियांनी मुलीचे अपहरण झाल्याचा आरोप केला. परंतु, आरोपीला अटक झाली तेव्हा खरे प्रकरण समोर आले.


पोलिस उपाधीक्षक मेघना यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन शहदरा येथे राहणारी 14 वर्षांची मुलगी शनिवारी दुपारी आपल्या घरातून बाहेर पडली होती. रात्री घरी पोहोचली नाही तेव्हा कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांना सूचना मिळताच त्यांनी मुलीचे कॉल डिटेल्स काढले आणि ती शेवटच्या काही तासांत एका तरुणाच्या संपर्कात होती असे समजले. पोलिसांनी त्या नंबरवरून आरोपीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल केली. परंतु, सक्तीने चौकशी केली तेव्हा आपला गुन्हा कबूल केला.


ट्यूशनमध्ये केला होता अपमान
आरोपी मुलगा 17 वर्षांचा असून तिच्याच शाळेत 12 वीला शिकत होता. तसेच त्याचे घर पीडित मुलीच्या घरापासून अवघ्या 3 गल्ली लांब होते. ट्युशनमध्ये या दोघांमध्ये काही वाद झाला होता. दोघांच्या भांडणात मुलीने सर्वांसमोर आपला अपमान केला असे त्याने सांगितले. या भांडणानंतर ते पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले आणि आरोपी तिला घेऊन सिनेमा पाहण्यासाठी गेला. ट्युशनमध्ये झालेला अपमान मात्र तो विसरला नाही. त्याच अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने चित्रपट पाहिल्यानंतर मुलीला एका निर्जन बांधकामस्थळी नेले. येथे कोल्ड्रिंकमध्ये भूलचे औषध दिले. यानंतर टेपच्या मदतीने तिचा गळा आवळला.

बातम्या आणखी आहेत...