आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी रेल्वे ‘तेजस’चे भाडे विमानापेक्षा तिप्पट, सर्व तिकिटांची झालीय विक्री

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरद पांडेय 

नवी दिल्ली-उत्सवाच्या काळात विशेषत: दिवाळी आणि छठदरम्यान रेल्वे, विमान सर्वांचेच भाडे अनेकपट वाढले आहे. पहिली खासगी रेल्वे तेजसचे भाडे विमानाच्या आताच्या तुलनेत दीडपट जास्त, तर सामान्य दिवसांच्या तुलनेत विमानाच्या भाड्याच्या तुलनेत तीनपट जास्त आहे. तेजसची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. या रेल्वे गाडीत प्रतीक्षा यादी नसते, तर विमानाचे भाडे सामान्य दिवसांच्या तुलनेत जवळपास आठपट वाढले आहे.
 

उत्सवाच्या काळात सर्वात जास्त प्रवासी दिल्लीतून पूर्वेकडे जाणारे असतात. यामुळे तिकडे जाणाऱ्या बहुतांशी रेल्वेंमध्ये आरक्षण सुरू (१२० दिवस आधी) होताच पूर्ण होते. मागणी वाढल्यानंतर राजधानी, शताब्दी आणि दुरांतोसारख्या प्रीमियम रेल्वेत डायनामिक चार्ज लागू असतानाही जास्त भाडे देऊन लोकांनी आरक्षण करून ठेवले आहे. सध्याची स्थिती अशी झाली आहे की, प्रीमियम रेल्वेत डायनामिक चार्जेस असतानाही आरक्षण उपलब्ध नाही. रेल्वे मंडळाचे कार्यकारी संचालक राजेशदत्त वाजपेयी यांनी सांगितले की, या उत्सवाच्या काळात अनेक मार्गांवर आरक्षित आणि अनारक्षित दोन्ही मिळून प्रवाशांची संख्या दुप्पट होते.
 

प्रवाशांना दिलासा देण्यासाठी विशेष रेल्वे चालवल्या जात आहेत. संपूर्ण नेटवर्कवर २५ टक्के प्रवासी वाढतात. दिल्ली विमानतळ चालवणारी कंपनी डायलचे प्रवक्ते सौरभ यांनी सांगितले की, सामान्य दिवसांमध्ये दिल्ली विमानतळावरील तिन्ही टर्मिनलवर ४० हजार प्रवासी प्रवास करतात, तर उत्सवाच्या काळात ही संख्या ५० हजारांपर्यंत पोहोचते. दिल्लीत सर्वात जास्त भाडे असलेले मार्ग पाटणा, वाराणसी, काेलकाता, लखनऊ, रांची, जम्मू, भोपाळ, अमृतसर आहेत. मुंबईहून अहमदाबाद आणि पाटणा जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी सांगितले की, दिल्ली-हावडा आणि दिल्ली-मुंबई हे दोन्ही मार्ग सर्वाधिक व्यग्र आहेत. डिसेंबर २०२१ पर्यंत दोन्ही मार्गांवर डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉर तयार होईल आणि सध्याच्या मार्गावरील मालगाड्या हटवल्या जातील. मार्ग खाली झाल्यानंतर दिल्ली-हावडा आणि दिल्ली-मुंबई मार्गावर मागणीप्रमाणे रेल्वे चालवल्या जातील. 
 

विमानाचे भाडेही ८ पटीपर्यंत वाढले
कुठून कुठपर्यंत    भाडे     सामान्य दिवसांत
 दिल्ली ते पाटणा     ९ हजार ते २० हजार     सुमारे ३ हजार
दिल्ली ते वाराणसी      ७४०० ते २३ हजार     सुमारे ३ हजार
दिल्ली ते लखनऊ     ३२०० ते ७२००    सुमारे १७००
कोलकाता ते पाटणा     ३९०० ते १६ हजार     सुमारे २ हजार
दिल्ली ते रांची      ८५०० ते १४ हजार     सुमारे ३ हजार
मुंबई ते अहमदाबाद      २३०० ते ७.५ हजार    सुमारे २ हजार
 

बातम्या आणखी आहेत...