आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Priya Bhambure Writes About Relationship Between Mother in law And Daughter In Law

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सासू नव्हे आई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिया भांबुरे

मोठ्या सहवासानंतरही माणसं एकमेकांना ओळखू शकतातच असं नाही. तुलनेनं कधी कधी थोडक्या वेळात माणसं एकमेकांशी स्नेहाच्या नात्यानं घट्ट बांधली जातात. 
 
पूर्वी, अगदी पूर्वी सासूने खरोखरच सुनेला फार जाच केला, असे ऐकू येत असे. त्याला काहीही कारणे असोत, मात्र तेव्हापासून सासू-सुनेचे नाते दूषित झाले आहे. तेव्हा तेवढ्या तीव्रतेने नसला तरी मधल्या काळात सुनेनेही त्याचा बदला घेतल्याचे वाचण्यात येते. पूर्वीही ‘चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे’, ही म्हण प्रचलित होतीच. यातील सत्यता पारखणे फार कठीण! आईची सासू होतानाची घालमेल मात्र आजही लक्षात येते. पण,आता ही परिस्थिती काही बघायला मिळत नाही.तसं पाहिलं तर आम्ही मुली फार नशीबवान आहोत. कारण, आम्हाला आयुष्यात दोन आईंचं प्रेम मिळत. एक माहेरी असताना, जी जन्मापासून मृत्यूपर्यंत आमच्यावर प्रेम करते.आणि दुसरी आई सासरी आल्यावर मिळते. ज्या उरलेल्या आयुष्यात साथ देऊन नवीन सुरू झालेल जीवन सावरायला पदोपदी सोबत राहतात. माझं काही महिन्यांपूर्वीच लग्नं झालं. मी नाशिकहून तळेगाव दाभाडे पुण्याकडे आले. निकुमांची प्रिया भांबुरेची सून झाली.  आणखी एक आई मला मिळाली. सुलभा भांबुरे. माझ्या सासूबाई. सुरुवातीला मला त्यांची फार भीती वाटायची. स्वभाव कसा असेल? त्यांचं आणि माझं जमेल का? अश् कितीतरी प्रश्नांची यादी मनात तयार झाली. पण, सासरी आल्यानंतर मनांत ज्या  काही प्रश्नांचा गोंधळ होता तो सगळा दूर झाला. आईच्या मोकळ्या स्वभावामुळे मी ह्या घरात नवीन आलेय, असं मला वाटलंच नाही. घरात आणि बाहेरही सगळ्यां गोष्टींच स्वातंत्र्य त्यांनी मला दिलं आहे. माझ्या आवडीनिवडी त्या जपतात. माझे लाड करतात. आता लग्नाला आठ-नऊ महिने होऊन गेलेत तरी रोजची कामंदेखील त्या मला अजून करू देत नाही. एका मुलीला जशी आपली आई जपते त्याप्रमाणे त्या मला जपत असतात. माझ्या सासूबाईंना माझ्या आईप्रमाणं देवा-धर्माची आवड आहे. समान आवडीनिवडी असणारं त्याचं एक छान भजनी मंडळ आहे. त्या भजनी मंडळात त्या नियमित जात असतात. त्यांच्या मंडळाचे बाहेर देखील कार्यक्रम होत असतात. सासूबाईंकडे पाहून एवढेच ओठी येते की, 


“माझी सासू माझी सासू ,  अशी मायेची पाखर 
होईन मी सून त्यांची , जन्मोजन्मी नि
रंतर”

लेखिकेचा संपर्क : ९८९००४८४७४

बातम्या आणखी आहेत...