आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करवाचौथला डान्सद्वारे इंटरनेटवर खळबळ माजवणाऱ्या मम्मीच्या सक्सेसमागे या व्यक्तीचा आहे हात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत - प्रयत्न कदीही वाया जात नाहीत, असे म्हणतात. गुजरातच्या सूरतमधील प्रिया गोलानी याचे ताजे उदाहरण आहे. करवाचौथला डान्सद्वारे इंटरनेटवर खळबळ उडवणारी प्रिया अनेक वर्षांपासून तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. इंटरनेटवर तिचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. 


19 वर्षांच्या मुलीची आई 
असे म्हटले जाते की, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठिशी एका स्त्रीचा हात असतो. त्याचप्रमाणे प्रियाच्या यशामागे तिचे पती विजय यांचा महत्त्वाचा वाटा आहे. 19 वर्षांच्या मुलीची आई असूनही प्रिया त्याच्या पॅशनसाठी कायम उत्साही राहिलेल्या आहेत. 


विजयच शूट करतात प्रियाचे व्हिडिओ 
प्रिया गोलानी यांनी करवा चौथला महानगर पालिकेच्या केबल स्टेड ब्रिजवर जो डान्स केला होता, तो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे. लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला. आनंद महल रोडवर राहणाऱ्या प्रिया हे सक्सेस एन्जॉय करत असून त्या नवनवीन व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. त्यांचे हे सर्व व्हिडिओ त्यांचे पती विजय हेच शूट करतात. पती विजयबरोबरचे अनेक बिनघधास्त फोटोज त्या फेसबूकवर पोस्ट करत असतात. 

चला पाहुयात फेसबूकवरील प्रिया गोलानी यांचे असेच काही PHOTOS

बातम्या आणखी आहेत...