आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- डोळ्यांनी प्रेमळ इशारे करत एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आलेली प्रिया प्रकाश वारियर ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गतवर्षी व्हॅलेंटाइन वीकमध्ये मल्याळम सिनेमा 'उरु अदार लव्ह'मधील लव्ह साँग 'मानिक्या मलारया पूवी'ची एक क्लिपने प्रिया प्रकाश इंटरनेट सेंसेशन बनली होती. देशभरातील लोकांनी ही क्लिप मोठ्या संख्येने शेअर केली होती. यंदाच्या हॅलेंटाइन वीकमध्येही ही मालिका कायम आहे. सोशल मीडियावर 'उरु अदार लव्ह' सिनेमातील एक व्हिडीओ क्लिप शेअर झाली आहे. त्यात प्रिया प्रकाश ही एक वेगळ्या अंदाजात दिसत आहे.
व्हिडीओमध्ये प्रियासोबत अभिनेता रोशन अब्दुल असून दोघे लिप-लॉक किसिंगमध्ये मग्न दिसत आहेत. Lovers Day Teaser नामक हा व्हिडीओ 6 फेब्रुवारीला 'यूट्यूब'वर अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत चार लाख लोकांनी व्हिडीओ पाहिला आहे तर 7 हजार लोकांनी तो लाइक केला आहे.
'उरु अदार लव्ह'मधून केले होते पदार्पण..
प्रिया प्रकाश हिने 'उरु अदार लव्ह'तून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. परंतु, सिनेमा रिलिज होण्याआधीच प्रिया चर्चेत होती. 'उरु अदार लव्ह' 3 मार्च 2018 रोजी रिलिज झाला होता.
दरम्यान, प्रिया प्रकाश वारियर लवकरच 'श्रीदेवी बंगलो'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती नुकतीच मुंबईत आली होती.
कोण आहे प्रिया प्रकाश वारियर...
18 वर्षीय प्रिया ही केरळची रहिवासी आहे. थ्रिसूरमधील विमला कॉलेजमध्ये ती बीकॉमचे शिक्षण घेत आहे. प्रियाला मॉडेलिंग तसेच याशिवाय तिला डान्सिंग आणि सिंगिंगचा आवड आहे. आतापर्यंत तिचे मार्केटमध्ये तीन म्युझिक व्हिडीओ आले आहेत.
सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून कमावते 8 लाख
एक व्हिडीओ हिट झाल्यानंतर प्रियाचे आयुष्य पार बदलून गेले आहे. तिने आपल्या लूकमध्ये बदल केले आहेत. रिपोर्ट्सनुसार, प्रिया एक सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून 8 लाख रुपये कमावते. एवढेच नाही तर तिला अनेक ब्रॅंन्ड्सनी जाहिरातीची ऑफर दिल्या आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.