आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद : मुलांना परिपूर्ण माणूस बनवण्यासाठी पालकांनी त्यांचे रोल मॉडेल बनावे. मुले पालकांना बघूनच शिकत असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे ऐका. खूप आग्रह करू नका. त्यांच्याही मतांचा आदर करा. चुकीच्या बाबी स्पष्ट करून मर्यादा निश्चित करा. त्याचबरोबर पोषणमूल्ये, मूल्यशिक्षण, सामाजिक जबाबदारी, मैदानी खेळ, कौशल्याबरोबर उद्योजकतेचेही संस्कार बालपणीच त्यांच्यात रुजवा, असा सल्ला पालकत्व या विषयातील समुपदेशक प्रिया सचान यांनी पालकांना दिला. पालकत्वाची कला या विषयावर सचान बोलत होत्या. पालकत्व निभावण्याच्या गरजेतून आठ वर्षांपूर्वी "शिशुवर्ल्ड डॉट कॉम' व यूट्यूब चॅनलचा उगम झाल्याचे त्यांनी सांगितले.
मुलांसाठी हे करा
मुलांना सुरक्षित वाटेल, मोकळेपणाने राहू शकतील अशी शाळा निवडा.
मुलांच्या शारीरिक, बौद्धिक विकासासाठी मैदानी खेळ महत्त्वाचे.
मूल्यशिक्षणासाठी रोल मॉडेल बना.
मुले आपल्याला बघून शिकतात, त्यामुळे जसे बोलाल तसेच वागा.
मुलांच्या मतांचा आदर करा, तरच ते तुमच्या मताचा आदर करतील.
मुलाला आजार नसताना तो दुबळा असेल तर हरकत नाही, गोलमटोल नको.
हिरव्या पालेभाज्या, व्हिटॅमिन सी, मधाचा मुलांच्या आहारात समावेश करा.
त्याना मातीत खेळू द्या.
हे करू नका
पती-पत्नीने मुलांसमोर आक्रमकपणे भांडू नये. तर चर्च केल्यासारखे, मत व्यक्त होईल असे भांडावे.
जंक फूड मुलांना आवडते मात्र, ते हेल्दी नाही, टाळा.
समारंभात कधीकधी जंकफूड खायला हवे.
सततच्या प्रशिक्षणातून मुले लीडर्स नव्हे, फॉलोअर्स बनतील.
इंटरनेटद्वारे माहितीचा भडिमार, त्यातून कौटुंबिक मूल्ये सांगणे आव्हानात्मक.
तंत्रज्ञानाचा वापर मर्यादेपलीकडे नको.
मुले खूप आक्रमक झाली आहेत. ते स्वतंत्ररीत्या स्वत:ला मांडू इच्छितात. त्यांना स्पष्ट सूचना द्यायला हव्यात. लहानपणी आपण त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी कार्टून दाखवतो. नंतर मात्र त्याबाबत नकार देतो. त्यांच्याबाबतीत कोणतीही बाब पूर्णपणे बंद करू नका. तंत्रज्ञान वापराची मर्यादा त्यांना ठरवून द्या. हळुहळू ते त्याप्रमाणे वागतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.