आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चटनी डॉन नावाने प्रसिद्ध आहे ही दबंग लेडी, नशा करून घडवते गुन्हा; अशाप्रकारे झाले तिचे नामकरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जमशेदपूर : 28 डिसेंबर रोजी झालेल्या लुटमारीबद्दल गिफ्ट आयटम व्यवसायिक नितिश कुमारने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रिय सिंह ऊर्फ चटनी डॉन, तिचा नवरा संतोष साव आणि राकेशला बुधवारी रात्री अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून लुटलेला मोबाइल जप्त केला आहे. लुटमार करणाऱ्यांमधील रौशन आणि करण अद्यापही फरार आहेत. गुरुवारी आरोपींच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात गदोराळ घातला होता. त्यांनी पोलिस ठाण्यावर दगडफेक देखील केली. 


नशा केल्यानंतर गुन्हा करत होती चटनी डॉन 

प्रिया आणि तिचा पतीविरोधात अनेक गुन्हे दाखल असून त्यांनी अनेकवेळा तुरूंगाची हवा खाल्लेली आहे. प्रिया नशा केल्यानंतर गुन्हा करत होती. 28 डिसेंबर रोजी प्रिया आणि तिच्या पतीने मिळून गिफ्ट आयटम व्यवसायिक नितिश कुमार आणि त्याच्या सहकाऱ्याला मारहाण करून दोन मोबाइल आणि 26 हजार रूपयांची लुट केली होती. नितिशने चटनी डॉन आणि इतरांविरोधात तक्रार दाखल केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींना अटक करण्यात आली होती. अटक झाल्यानंतर आरोपींच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात गदारोळ घातला होता. यावेळी पोलिस ठाणे प्रमुखाने त्यांना बाहेर जाण्यास सांगितले, पण कुटुंबीयांनी पोलिसांसमक्ष गोंधळ घालत होते. जवळपास 10 मिनिटे हा गोंधळ सुरु होता. 


पती-पत्नी दोघेही करत होते नशा - प्रिया सिंहचे तुरूंगात झाले नामकरण 
आरोपी संतोषने सांगितले की, तो ब्राउन शुगर, दारू आणि इतर अमली पदार्थांचे सेवन करतो. त्याची पत्नी प्रिया ऊर्फ चटनी डॉन सुद्धा नशा करते. नशा करण्यासाठी घरी पैसे न मिळाल्यास लुटमारीचे काम करत होते. संतोष आणि प्रियाची मैत्री झाल्यानंतर दोघांनी लग्न केले. त्यानंतर दोघे मिळून एकत्र गुन्हे करत होते. 2013 दोघांनी एक दरोडा टाकला होता. याप्रकरणात दोघांनाही तुरूंगात जावे लागले होते. प्रिया सिंहचे चटनी डॉन हे नामकरण तुरूंगातच झाले होते. 2017 साली दोघेही बाहेर आल्यानंतर त्यांचा एका हल्ल्यामध्ये पुन्हा कारावासात जाण्याचा योग आला. याप्रकरणातून दोघेही नुकतेच बाहेर आले होते. 28 डिसेंबर रोजी संतोष, पत्नी प्रिया, रोशन आणि करण सिंह नववर्षाचे साजरे करण्यासाठी एखाद्या कार्याची योजना आखत होते. दरम्यान त्यांना आशियाना गार्डेनकडून दोन एका बाइकवरून येताना त्यांना दिसले. प्रियाने त्यांना हात दाखवून थांबविले. बाइक थांबवताच इतरांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि घराच्या पाठीमागे घेऊन गेले. तेथे दोघांना मारहाण करून त्यांच्याकडील मोबाइल आणि रोख रक्कम हिसकावून घेतली.