आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्रिश्चन वेडिंगमध्ये प्रियांकाने परिधान केलेल्या गाऊनमध्ये लागले होते 24 लाख मोती, लिहिली होती पती आणि पॅरेंट्सची नावे, 75 फूट लांब होता दुपट्टा, सांभाळण्यासाठी होते पाच जण : 7 Photo

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एंटरटेन्मेंट डेस्कः प्रियांका चोप्रा आणि निक जोनास ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने पार पडलेल्या विवाहसोहळ्यानंतर पती-पत्नी बनले आहेत. दोघांचे जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये लग्न झाले. लग्नानंतर पीपल्स मॅगझिनने मंगळवारी त्यांच्या लग्नाचे ऑफिशिअल फोटोज आणि व्हिडिओज प्रकाशित केले आहेत. ख्रिश्चन वेडिंगनंतर प्रियांका-निक यांनी एकमेकांना किस करुन प्रेम व्यक्त केले. यावेळी दोघांच्याही हातात वाइनचा ग्लास होता. कपलची रोमँटिक पोज बघून त्यांच्या शेजारी असलेले नातेवाईक एक्साइटेड झालेले फोटोमध्ये दिसत आहेत. 

 

ख्रिश्चन वेडिंगवेळी आईचा हात हातात घेऊन पोहोचली प्रियांका... 
- प्रियांकाचा ख्रिश्चन वेडिंगचा ड्रेस डिझायनल  राल्फ लॉरेन यांनी  तासांचा कालावधी लागला होता. 

 

- पीसीच्या गाऊनमध्ये लाँग स्लीव्स आणि स्टेपलेस कॉलम आहे. या गाऊनमध्ये तब्बल 23 लाख 80 हजार मोती लावण्यात आले असून गाऊनवर हँड एम्ब्रॉयडरी केली गेली आहे. शिवाय त्यावर पती आणि प्रियांकाच्या आईवडिलांचे नाव लिहिले गेले आहे. 

 

- 1 डिसेंबर रोजी झालेल्या या ख्रिश्चन वेडिंगमध्ये पीसीनेे परिधान केलेल्या गाऊनसोबत जो दुपत्ता होता तो तब्बल 75 फूट लांब होता. प्रियांका लग्नस्थळी जात असताना हा दुपट्टा पाच जणांनी पकडून ठेवला होता. वेडिंग गाऊनसोबत प्रियांकाने Jimmy Choo ब्रॅण्डचे शूज घातले होते.

 

- प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन्ही पद्धतीने पार पडलेल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहे. ख्रिश्चन पद्धतीने झालेल्या लग्नाच्या फोटोसोबत प्रियांकाने कॅप्शन लिहिले, 'And forever starts now..'

 

पुढील स्लाईड्सवर बघा, निकयांकाच्या ख्रिश्चन वेडिंगचे फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...