आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Priyanka 3 Days In Lucknow; Talk To Congress Suporter In 42 Lok Sabha Constituencies

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रियंका 3 दिवस लखनऊमध्ये; 42 लोकसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांशी चर्चा करणार 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- काँग्रेस महासचिव प्रियंका वढेरांनी लखनऊत रोड शो करत आपल्या राजकारणास प्रारंभ केला. महासचिव व पूर्वी उत्तर प्रदेशातील प्रभारी झाल्यानंतर प्रियंकांचा हा पहिलाच दाैरा होता. प्रियंका तीन दिवस लखनऊत राहणार आहेत. या तीन दिवसांत ४२ लोकसभेच्या जागांसंदर्भात आपल्या पक्षाच्या राजकीय शक्तीचा अभ्यास करणार आहेत. 


१२, १३ व १४ फेब्रुवारीला साडेनऊ वाजेपासून रात्री साडेअकरा वाजेपर्यंत पक्षाच्या कार्यालयात वेगवेगळ्या लोकसभेच्या जागांसंदर्भात कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत. प्रत्येक जागेवर एक-एक तास चर्चा करणार आहेत. प्रियंकांना भेटणाऱ्यांमध्ये जिल्हाध्यक्ष व स्थानिक नेत्यांचा समावेश आहे. एका जागेसाठी १५ कार्यकर्त्यांची निवड होणार आहे. प्रियंका गांधींच्या टीममध्ये चार जण आहेत. ते या मुलाखतींच्या नोट्स करणार आहेत. प्रियंका या नोट्ससह राहुल गांधींशी चर्चा करतील. त्यानंतर काँग्रेसचे या लोकसभा मतदार संघातील उमेदवार निश्चित होणार आहेत. 

 

प्रियंका सेना : इंदिरा गांधींच्या वानर सेनेसारखे काम 
रोड शोमध्ये इंदिरा गांधींच्या वानर सेनेप्रमाणे प्रियंकांच्या सेनेचे सदस्यही सहभागी झाले. टीममधील ५०० कार्यकर्त्यांनी पिंक टी-शर्ट व पँट परिधान केली होती. खासदार सुष्मिता देव यांनी काही फोटो शेअर केले. 

 

अवध क्षेत्र : १५ जागा कव्हर करण्याचा प्रयत्न 
लखनऊच्या जवळपास अवध क्षेत्रात १५ लोकसभेच्या जागा येतात. त्यातील ७ जागा २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसकडे होत्या. या 'रोड शो'च्या माध्यमातून प्रियंकांनी १५ जागा कव्हर करण्याचा प्रयत्न केला. प्रियंकांच्या एंट्रीमुळे नवीन समीकरण तयार होत आहे. यामुळे आता २५-२५ फाॅर्म्युल्यावर चर्चा सुरू झाली आहे. त्यानुसार बसपा, सपा, काँग्रेस २५-२५ जागांवर निवडणूक लढवू शकतात. अन्य पाच जागा इतरांना देणार आहे. 

 

पोस्टर वाॅर : प्रियंकांना मां दुर्गाच्या रूपात दाखवले 
प्रियंकांच्या रोड शोमुळे लखनऊत सर्वत्र होर्डिंग, पोस्टर व बॅनर दिसून येत आहेत. एका पोस्टरमध्ये प्रियंकांना मां दुर्गाच्या रूपात दाखवले आहे. एकावर लिहिले आहे, 'मां दुर्गाचे रूप बहन प्रियंका जी.' 
 
वढेरा म्हणाले- जनतेच्या सेवेसाठी देत आहे 
प्रियंकांचे पती राॅबर्ट वढेरा यांनी फेसबुकवर प्रियंकांच्या राजकीय कारकीर्दीला शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले, उत्तर प्रदेशातील नवी भूमिका व जनतेच्या सेवेसाठी माझ्या शुभेच्छा. तू माझी बेस्ट फ्रेंड, परफेक्ट वाइफ व मुलांची बेस्ट मदर आहे. सध्या बदलाच्या राजकारणाचे वातावरण आहे. परंतु लोकांची सेवा करणे तुझे कर्तव्य आहे. आता मी प्रियंकाला देशासाठी देत आहे. कृपया तुम्ही तिला सुरक्षित ठेवा. 

 

बातम्या आणखी आहेत...