आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या तयारीस झाली सुरुवात, आज आईसोबत जोधपुरमध्ये प्रियांका चोप्रा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपुर. अनेक ऐतिहासिक आणि भव्य कार्यक्रमांचा साक्षीदार असलेले उम्मेद भवन पॅलेस या महिन्याच्या अखेरीच अजून एका भव्य वेडिंग फंक्शनसाठी तयार होत आहे. बॉलिवूड-हॉलिवूड अॅक्टर प्रियांका चोप्रा आणि सिंगर निक जोनसचे लग्न उम्मेद भवन पॅलेसमध्ये 2 डिसेंबरला होणार आहे. हा लग्न सोहळा तीन दिवस सुरु राहणार आहे. एक डिसेंबरला मेंदी सेरेमनी आणि लेडीज संगीत असणार आहे.

 

प्रियांका चोप्राने उम्मेद भवन पॅलेस फायनल केल्यानंतर येथे लग्न सोहळा भव्य असावा यासाठी तयारी सुरु झाली आहे. ही सर्व तयारी पाहण्यासाठी आणि ताज ग्रुपच्या टीमसोबत फायनल डिस्कस करण्यासाठी प्रियांका चोप्रा आपल्या आईसोबत गुरुवारी सकाळी चार्टर प्लेनने जोधपुरमध्ये पोहोचणार आहे. लेडीज संगीतसाठी निक जोनसही प्रियांकासाठी काही खास लव्ह साँग्स तयार करत आहे.

 

प्रियांकाने एंगेजमेंटसाठी ब्रेसलेट, नेकलेससोबतच ज्वेलरी जोधपुरमध्येच तयारी करावी लागली. यामुळे प्रियांका ज्वेलरी पसंत करण्यासाठीही जोधपुरमध्ये जाणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. प्रियांका आणि तिची आई मेहरानगढला व्हिजिट करणार आहे. येथे मेंदी सेरेमनी होईल. आपल्या व्यस्त शेड्यूलमुळे प्रियांका संध्याकाळी परतणार आहे. पण तिची आई रात्री येथेच थांबणार आहे.

 

उम्मेद भवन पॅलेसला वेडिंग डेस्टिनेशनसाठी फायनल केल्यानंतर प्रियांका आणि निक 2 अक्टोबरला चार्टर ब्लेनने जोधपुरला आले होते. त्यांनी येथील व्यवस्था पाहिली, पण रुम कमी असल्यामुळे डेस्टिनेशन फायनल होऊ शकले नव्हते. नंतर प्रियांकाने जोधपुरमध्येच लग्न करण्याचे फायनल केले आणि ताज ग्रुपला याची जबाबदारी सोपवली होती.

 

उम्मेद भवन पॅलेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून हे लग्न भव्य व्हावे यासाठी तयारी केली जात आहे. प्रियांकाने आपल्या वेडिंग फंक्शनचे राइट्स एका मॅजझीनला विकले असल्याचे बोलले जातेय. प्रियांका आणि तिची आई जोधपुरमध्ये ताज ग्रुपच्या टीमसोबत लग्नाची तयारी आणि कार्यक्रमाच्या नियोजनावर चर्चा करणार आहेत.

 

प्रियांका आणि मधु चोप्रा लग्न सोहळ्याची तयारी, यासोबतच सिक्योरिटी आणि इतर व्यवस्थांचे फायनल डिस्कशन करतील. ते खास राजस्थानी फूड मेन्यू सर्व्ह करण्याच्या विषयावर बोलणार आहेत. यापुर्वी उम्मेद भवन पॅलेसमध्ये बिझनेस टायकून अरुण नायरने ब्रिटिश मॉडल-अॅक्ट्रेस एलिजाबेथ हर्ले यांचा भव्य विवाह सोहळा पार पडला होता.

 

2 मार्च 2007 ला उम्मेद भवन पॅलेसमध्ये झालेल्या लग्नाच्या कव्हरेजचे राइट्स एका मॅग्झीनला 2 मिलियन पाउंडमध्ये विकण्यात आले होते. त्या लग्नानंतर हॉलिवूड-बॉलिवूड सेलिब्रिटीचे येथे दूसरे भव्य लग्न होत आहे. या लग्नात हॉलिवूड आणि बॉलिवूडचे टॉप सेलिब्रिटीज येण्याची शक्यता आहे.
 

 

 

बातम्या आणखी आहेत...