आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka And Nick Are Spending Quality Time With Each Other In The Beautiful Surroundings Of Italy

इटलीच्या सुंदर वातावरणात एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत प्रियांका आणि निक, रोमँटिक स्टाईलमध्ये केला डान्स  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री प्रियांका चोप्राचा आगामी चित्रपट 'द स्काय इज पिंक' लाविकाराचं रिलीज होणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रासोबत फरहान अख्तर आणि 'दंगल' गर्ल जायरा वसीम हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचे जेव्हापासून लग्न झाले आहे तेव्हापासूनच ते सतत चर्चेत असतात. अशातच प्रियांकाचा पती निकने त्या दोघांचा स्वयंपाक करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. 

 

आता त्यांचा अजून एक रोमँटिक व्हिडीओ वायरल होत आहे. हा व्हिडिओदेखील प्रियांकाचा पती निक जोनासनेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे आणि हा खूप वेगाने व्हायरल होत आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनसव्हिडिओमध्ये खूपच रोमँटिक दिसत आहेत आणि हा व्हिडीओ इटलीचा आहे. इटलीच्या सुंदर निसर्गरम्य वातावरणात दोघे डान्स करताना आणि एन्जॉय करताना दिसत आहेत. निक आणि प्रियांका या व्हिडिओमध्ये खूपच रोमँटिक आणि क्युट दिसत आहेत.  

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

🇮🇹 + ❤️

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on