आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - शिवसेनेने राज्यसभेचे उमेदवार म्हणून प्रियंका चतुर्वेदी यांच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेस सोडून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांनी विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंचा प्रचार केला होता. परंतु, अद्याप शिवसेनेकडून त्यांना मोठी जबाबदारी मिळाली नव्हती. आता मात्र शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करत त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेनेकडून औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा होती. परंतु, ऐनवेळी काँग्रेसमधून आलेल्या चतुर्वेदी यांना शिवसेनेने उमेदवार घोषित केले आहे. या निर्णयामुळे शिवसेनेच्या जुन्या आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.
राजकारणात येण्यापूर्वी प्रियंका चतुर्वेदी यांनी जनसंपर्क आणि माध्यम क्षेत्रात काम केले आहे. विविध माध्यमांमध्ये त्या अजुनही लेख लिहितात. एमपावर कंसल्टंटच्या संचालक राहिलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांनी 2010 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांना काँग्रेसने भारतीय युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेसह विविध मुद्द्यांवर शरसंधाण केले. त्यांनी अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सुद्धा हल्लाबोल केला होता. परंतु, एप्रिल 2019 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांनी उत्तर प्रदेश काँग्रेसवर आरोप करण्यास सुरुवात केली. पक्षाकडून कारवाई होउन सुद्धा काही सदस्य आणि पदाधिकारी आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार त्यांनी ट्विटरवर केली होती. या घटनेनंतरच त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.