आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलेब लाइफ / अखेर प्रियांकाने इंस्टाग्रामवर बदलले नाव, चोप्रासमोर लावले पती निकचे आडनाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड डेस्कः भारतीय पद्धतीनुसार मुली लग्नानंतर आपले आडनाव बदलतात. ही पद्धत अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही फॉलो केली आहे. प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील नावापुढे जोनास हे आडनाव लावले आहे. अलीकडेच न्यूमेरॉलॉजिस्ट संजय जुमानी यांनी सल्ला दिला होता की, प्रियांकाने नाव बदलल्यास तिला भावी आयुष्यात यश आणि सन्मान मिळेल. 

 

संजय यांनी सांगितले होते...

संजय यांनी दैनिकभास्करला सांगितले होते की, जर प्रियांकाने तिच्या नावासमोर जोनास आडनाव जोडले तर  न्यूमेरॉलॉजीनुसार 19 नंबर जुळेल. हा नंबर यश आणि सन्मानाचे प्रतीक आहे. 

 

प्रियांकाच्या भाग्यात होईल वृद्धी...

हा नंबर भाग्यशाली आणि फेव्हरमध्ये काम करणारा आहे. हा सूर्याचा प्रतिक असून त्याला 'प्रिन्स ऑफ हेवन' म्हटले जाते. हा नंबर आनंद, यश, सन्मान देतो आणि भविष्यातील योजना यशस्वी करतो.  
 

13 वर्षांपूर्वीचे प्रेडिक्शन ठरले खरे... 
संजय यांनी सांगितले, प्रियांका चोप्राची जन्मतारखेत 9 नंबर हा दोनदा येतो (18+7+1982=9) आणि (1+8=9). ती वयाच्या 36 (9) व्या वर्षी लग्न करत आहे. हे मी 13 वर्षांपूर्वीच सांगितले होते. एका मुलाखतीत त्यांनी प्रियांकाच्या लग्नाविषयी हे भाकित वर्तवले होते. 9 नंबर हा मंगळाचा असतो आणि प्रियांकाच्या बाबतीत हा नंबर दोनदा येतो. प्रियांका स्वभावाने अतिशय महत्त्वकांक्षी आहे.

 

निक राहावे लागेल सावध
- प्रियांका 18 (9) वर्षांची असताना मिस वर्ल्ड बनली होती. तर 27 (9) व्या वर्षी 'फॅशन' आणि 'दोस्ताना' या चित्रपटांच्या माध्यमातून ती आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सामील झाली. तिचे नाव 9 नंबर असलेल्या अक्षय कुमारसोबत जोडले गेले होते. असे अक्षयची कन्या रास असल्याने झाले होते.

- निक ( जन्मतारीख 16 सप्टेंबर) सुद्धा कन्या राशीचा आहे. माझ्या सल्ला आहे की, निकने प्रियांकाच्या डोमिनेटिंग, स्ट्रेट फॉर्वर्ड स्वभावापासून सावध राहायला हवे.

 

दोघांचेही होतील मूड स्विंग..
- प्रियांका आणि निक हे दोघेही पाणी आणि भूमीचे प्रतिक आहेत. त्यामुळे ते भूमी आणि पाणीप्रमाणे मेड फॉर इच अदर आहेत, जे कायम सोबत असतील. त्यांच्यात अनेक गोष्टींत साम्य आहे. निक आणि पीसीच्या नावाच्या स्पेलिंगची टोटल 2 आहे. Nick (5+1+3+2=1+1=2) PC (8+3=1+1=2). दोघेही 2 नंबर (चंद्र) आणि 7 नंबर (जल) द्वारे नियंत्रित आहेत.

 

- हा ग्रह मेंटल स्पेस आणि मूड स्विंगचे कारण बनू शकतो. त्यासाठी निकला योगा प्राणायाम आणि ध्यान करायला हवे. तर प्रियांकाला योगा आणि व्यायाम. या अॅक्टिव्हिटिज दोघांनाही शांत राहण्यास मदत करतील.

 

बातम्या आणखी आहेत...