आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी झाली होती प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची पहिली भेट, जाणून घ्या पहिल्या भेटीचा किस्सा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क: अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा अमेरिकन बॉयफ्रेंड निक जोनास यांच्या नात्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. आज (18 ऑगस्ट) सकाळी प्रियांकाच्या राहत्या घरी तिची रोका सेरेमनी पार पडली. या सेरेमनीचे काही फोटोज समोर आले आहेत. यामध्ये प्रियांका यलो कलरच्या लहेंग्यात तर निक व्हाइट कलरच्या शेरवानीत दिसतोय. शिवाय पूजेत प्रियांकाचे भावी सासूसासरेदेखील सहभागी झाल्याचे या फोटोजमध्ये बघायला मिळत आहे. आता संध्याकाळी मुंबईतच प्रियांका आणि निक एंगेज्मेंट पार्टी देणार आहेत. निक हा प्रियांकापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. 


कशी सुरु झाली प्रियांका आणि निकची लव्ह स्टोरी जाणून घेऊयात..
 
'क्वांटिको'च्या सेटवर झाली होती पहिली भेट

- रिपोर्ट्सनुसार, प्रियांका चोप्रा आणि अमेरिकी पॉप स्टार निक जोनस यांची पहिली भेट 'क्वांटिको'च्या सेटवर एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. यानंतर दोघ गेल्यावर्षी 1 मे रोजी न्यूयॉर्क मध्ये झालेल्या 'मेट गाला' फंक्शनमध्ये एकत्र पोहोचले होते.


- प्रियांकाला एका मुलाखतीत याविषयी विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, 'निक आणि मी एकाच डिझायनर( राल्फ लॉरेन)चा ड्रेस घालणार होतो आणि यामुळे आम्ही एकत्र जाण्याचा निर्णय घेतला.' परंतू मुलाखतीदरम्यान प्रियांकाने आपल्या पहिल्या भेटीचा उल्लेख केला नाही.

 
- यानंतर सप्टेंबर 2017 मध्ये एका मुलाखती दरम्यान निकने आपल्या पहिल्या भेटीविषयी सांगितले होते. त्याने सांगितले होते की, 'क्वांटिकोमध्ये प्रियांकाचा को-स्टार ग्राहम रोजरच्या माध्यमातून आमची ओळख झाली होती.' ग्राहम रोजर निक जोनासचा को-स्टार राहिला आहे. दोघांनी 'केअरफुल वॉट यू विश फॉर' चित्रपटात एकत्र काम केले होते.

 

या निमित्ताने दिसली दोघांची जवळीक....
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस गेल्यावर्षी अनेकवेळा एकत्र स्पॉट झाले. परंतू मागिल काही दिवसात दोघं एकत्र फिरताना दिसले. काही दिवसांपुर्वी दोघं बेसबॉल मॅच एन्जॉय करतानाही दिसले होते. असे बोलले जाते की, प्रियांकाने गेल्यावर्षी सिंगल अल्बम 'एक्सॉटिक' (Exotic) लाँच केले होते. त्यामध्येही निकने तिला साथ दिली.

 

- निकच्या भावाच्या लग्नात पोहोचली होती प्रियांका : 
काही दिवसांपुर्वी न्यू जर्सीमध्ये निकच्या कजिनचे लग्न होते. यावेळी प्रियांका उपस्थित होती. निक आणि प्रियांका काही दिवसांपुर्वीच एयरपोर्टवर दिसले होते. त्यावेळी ते न्यू जर्सीसाठी रवाना झाले होते. निकच्या भावाच्या लग्नात दोघं हातात हात घालून दिसले होते. यामध्ये प्रियांकाने गोल्डन कलरचा गाउन घातला होता, तर निक सूटमध्ये दिसला होता.

बातम्या आणखी आहेत...