आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंपाक करताना दिसले प्रियांका चोप्रा आणि पती निक, असा होता जोनस दाम्पत्याचा रात्रीच्या जेवणाचा बेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचे फोटोज आणि व्हिडीओज शेअर होताचव्हायरल होतात. त्यांची प्रसिद्धी आता खूप वाढली आहे त्यामुळे ते सतत चर्चेत असतात. अशातच सोशल मीडियावर प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा एक व्हिडीओ व्हरल होत आहे आणि त्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांका आणि निक स्वयंपाक करताना दिसत आहे. हा व्हिडीओ इतर कुणी नाही तर स्वतः प्रियांकाचा पती निक जोनासने आपल्या सोशल मीडिया वर शेअर केला आहे. व्हिडीओव्यतिरिक्त त्यांचे काही फोटोजही यामध्ये आहेत.  

 

असा होता जोनस दाम्पत्याचा रात्रीच्या जेवणाचा बेत... 
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास कुकिंग क्लासेस घेत आहेत, ज्याचा व्हिडीओ निक जोनासने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शन दिले आहे, 'रात्रीचे जेवण बनवण्याची प्रक्रिया.' व्हिडिओमध्ये जिथे एकीकडे प्रियांका पास्ता बनवंतांना दिसत आहे तर दुसरीकडे निक जोनास नूडल्स बनवताना दिसत आहे. स्वयंपाक करताना दोघे खूपच क्युट दिसत आहेत. व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्राने यलो ड्रेस घातला आहे, तर निक जोनास ब्लॅक टी-शर्ट मध्ये आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Date night cooking extravaganza.

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on