आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Chopra And Nick Jonas Are In Paris For The Pre Wedding Celebrations Of Joe Jonas And Sophie Turner

प्रियांकाचा दीर जो आणि गेम ऑफ थ्रोन्स फेम सोफी यांचे पॅरिसमध्ये प्री-वेडिंग सेलिब्रेशन; रोमँटिक अंदाजात दिसले प्रियांका-निक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क - प्रियांका चोप्रा जोनस आणि निक जोनस सध्या पॅरिसमध्ये आहेत. जो जोनस आणि गेम ऑफ थ्रोन्स फेम सोफी टर्नर यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी दोघे तेथे गेले आहेत. जो आणि सोफी पॅरिसमध्ये दुसऱ्यांदा लग्न करत आहेत. यापूर्वी त्यांनी पॅरिसमध्येच एक ग्रँड प्री-वेडिंग सेलिब्रेशन ठेवले होते. यावेळी प्रियंका-निक खूपच रोमँटिक अंदाजात दिसले होते. सुत्रांनुसार रविवारी हा विवाह संपन्न होणार आहे. 


प्रियंकाने इंस्टाग्रामवर शेअर केले फोटोज

प्रियंकाने या सेलिब्रेशनचे काही फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. यावेळी प्रियंका लेव्हेंडर-शायनी ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तर निक ग्रे सूटमध्ये दिसून आला. यावेळी हे दाम्पत्य खूपच रोमँटिक अंदाजात दिसत होते. हे फोटो शेअर करताना प्रियंकाने 'इट इज इन द इअर' असे कॅप्शन लिहिले होते. 

या समारोहाचे अनेक फोटोज समोर आले आहेत. यावेळी जोनस परिवार आणि त्यांचे मित्र समारोहाचा आनंद घेताना दिसत आहे. गेल्या चार दिवसांपासून हे सेलिब्रेशन सुरू आहे. पूल पार्टीपासून इतरही वेगळ्या प्रकारे या समारोहाचा आनंद घेण्यात आहे. या सोहळ्यासाठी जोनस परिवार खासगी जेटने पेरिसमध्ये दाखल झाले. यादरम्यान प्रियांका, तिची आई मधु चोप्रा आणि निकला सोबत एअरपोर्टवर पाहण्यात आले होते. 

 

जो-सोफी यांनी मे महिन्यात केले होते लग्न
सोफी आणि जो ने मे महिन्यात लॉस वेगास येथे पहिल्यांदा गुपचुप लग्न केले होते. आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत त्यांनी सर्वांचा आश्चर्यचकित केले होते. वेगास येथील एका चर्चमध्ये त्यांनी लग्न केले होते. यानंतर या दाम्पत्याने लग्नाच्या प्रमाणपत्रासाठी सरकारकडे अर्ज सादर केला होता. अमेरिकी सरकारने मंजूरी दिल्यानंतर आता दोघेही ग्रँड लेव्हलवर जो-सोफी पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकत आहेत.