आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Chopra And Nick Jonas Buy 144 crore House, Mother Madhu Chopra Explains

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने खरेदी केले 144 कोटींचे घर, आई मधु चोप्राने केले स्पष्ट 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनासने अमेरिकेच्या लॉस अँजेलिसमध्ये 144 कोटी रुपयांचे घर खरेदी केले. सांगितले जात आहे की, प्रियांका आणि निकने 20,000 स्क्वेअर फूट एवढी संपत्ती खरेदी केली आहे. यासाठी त्यांनी 144 कोटी रुपये खर्च केले आहेत. निकयांकाच्या या आधुनिक घरात सात बेडरूम, 11 बाथरूम, उंच छत आणि पुरेशी बाहेरील जागा आहे. याची माहिती प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी स्वतः दिली आहे. 


दोघांनी डिसेंबर 2018 मध्ये लग्न केले होते. एका मुलाखतीदरम्यान प्रियांका म्हणाली होती, 'घर खरेदी करणे आणि आई होणे माझ्या टू-डू लिस्टमध्ये आहे. माझ्यासाठी घर ते आहे, जिथे मी खुश आहे. माझ्या आसपासचे लोक खुश आहेत.'