आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 Photos मध्ये बघा प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचे रिसेप्शन, कधी रोमँटिक होताना तर कधी पीएम मोदींसोबत गप्पा मारताना दिसले नवविवाहित दाम्पत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- प्रियांका चोप्रा अलीकडेच अमेरिकन गायक निक जोनाससोबत विवाहबद्ध झाली. 1 आणि 2 डिसेंबर रोजी जोधपूरच्या उम्मेद पॅलेस भवन येथे ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने दोघांचे लग्न झाले. 4 डिसेंबर रोजी त्यांचे दिल्लीत पहिले वेडिंग रिसेप्शन पार पडले. या पार्टीत प्रियांका आणि निकच्या कुटुंबीयांव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आकर्षणाचे केंद्रबिंदू  राहिले. मोदींनी नवविवाहित दाम्पत्याला सुखी वैवाहिक आयुष्याासाठी शुभेच्छा दिल्या आणि गिफ्ट स्वरुपात एक-एक गुलाबाचे फुल दिले. प्रियांका आणि निक यावेळी मोदींसोबत गप्पा मारतानाही दिसले.   

 

रोमँटिक अंदाजात दिसले प्रियांका-निक

- रिसेप्शनमध्ये प्रियांका निक स्टेजवर रोमँटिक अंदाजात पोज देताना दिसले. यावेळी पत्नी प्रियांकावरुन निकची नजरच हटत नव्हती.


- रिसेप्शनमध्ये परिणीती चोप्रा आणि तिचे आईवडील रिना चोप्रा आणि पवन चोप्रा अनुपस्थित होते. रिना आणि पवन चोप्रा यांनीच प्रियांकाचे कन्यादान केले. 


- निकच्या कुटुंबातून त्याचे वडील पॉल केविन जोनास, आई डेनिस, भाऊ जो आणि होणारी जाऊ सोफी टर्नर रिसेप्शनमध्ये हजर होते. 


- पुढील आठवड्यात मुंबईत प्रियांका आणि निक रिसेप्शन पार्टी आयोजित करणार आहेत. 
पुढील स्लाईड्सवर बघा, प्रियांका-निकच्या रिसेप्शनचे 10 फोटोज...

बातम्या आणखी आहेत...