आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेरवानी, चुडीदारमध्ये सजलेल्या निकने भरले प्रियांकाच्या भांगेत कुंकू, व्हिंटेज कारने पोहोचला लग्नस्थळी, हत्तीवरुनही निघाली वरात, मधु चोप्रांनी केले व-हांडींचे स्वागत : असे झाले निकयांकाचे हिंदू पद्धतीने लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता ऑफिशिअली मिसेस निक जोनास झाली आहे. रविवारी प्रियांकाने तिच्यापेक्षा वयाने दहा वर्षांनी लहान असलेल्या अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत सप्तपदी घेतल्या. लग्नाच्या सर्व विधी जोधपूरच्या उम्मेद भवन येथे पार पडल्या. लग्नाच्या विधी खास बनवण्यासाठी निक आणि प्रियांका यांनी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले. निकच्या वरातीसाठी घोडी आणि हत्तीला सजवण्यात आले होते. निक जोनास व्हिंटेज कारने लग्नस्थळी पोहोचला आणि व्हेन्यूवर पोहोचल्यावर तो हत्तीवर स्वार झाला. पॅलेसच्या आत नंतर पुन्हा वरात काढण्यात आली होती. भारतीय पद्धतीने झालेल्या या लग्नात मेहुणीने निकचे बुटही चोरले होते.


मंडपापर्यंत अशी पोहोचली वरात...
लग्नात निक घोडीवरही स्वार झाला होता. उम्मेद भवन पॅलेसच्या बारादरीमध्ये रविवारी रात्री निक आणि प्रियांका यांनी सप्तपदी घेतल्या. पॅलेसच्या प्लाजा एरियात मंडप बनवण्यात आला होता. बंगळुरु येथून आलेले पंडीत चंद्रशेखर शर्मा यांच्यासह 11 पंडितांनी प्रियांका-निकच्या लग्नाचे मंत्र वाचले. निकने रात्री साडे आठच्या सुमारास अग्निला साक्षी मानून प्रियांकासोबत लग्नगाठ बांधली. लग्नासाठी निकने शेरवानी आणि चुडीदारला पसंती दिली. सजलेल्या घोडीवर बसलेला निक एखाद्या राजकुमारसारखा भासला. हत्ती-घोड्यांसह सनई चौघड्यांच्या सूरात निक वरात घेऊन लग्नमंडपी पोहोचला. लग्नात सहभागी झालेल्या देशी-परदेशी पाहुण्यांनी यावेळी डान्सही केला. सर्व पाहुणे ट्रेडिशन कॉश्च्युममध्ये दिसले. वधूच्या वतीने प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी वरातीचे स्वागत केले.


परिणीतीने लपवले निकचे बुट... 
यावेळी बुट लपवण्याची विधीही पार पडली. निकची मेहुणी आणि प्रियांकाची चुलत बहीण परिणीती चोप्राने निकचे बुट लपवले आणि त्या बदल्यात त्याच्याकडे पाच लाख डॉलरची मागणी केली. निकने परिणीतीला शगुनचे पैसे दिल्यानंतर परिणीतीने त्याचे बुट परत केले. सोमवारी सकाळी ब्रंचनंतर पाहुणे जोधपूरहून रवाना होणार आहेत.

 

लग्नात सहभागी झाले हॉलिवूडचे पाहुणे... 
पीसीच्या लग्नात तिचे हॉलिवूड फ्रेंड्स अमेरिकन अॅक्टर ड्वेन जॉनसन, कॅनेडियन अॅक्ट्रेस लिली सिंह, इंटरनॅशनल अॅक्ट्रेस- डान्सर यास्मीन अल मसरी, अमेरिकन अॅक्टर जोनाथन टकर, अमेरिकन अॅक्ट्रेस एलिजाबेथ चैम्बर्स, अमेरिकन सिंगर मार्टिन गैरिक्स, अमेरिकन सिंगर फ्रेंकी जोनास  सहभागी झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...