आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती-पत्नी म्हणून एकमेकांचा स्वीकार केल्यानंतर निक-प्रियांकाने केले लिप लॉक, आता समोर आले 'त्या' खास क्षणांचे PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाचे दररोज नवनवीन फोटोज समोर येत आहेत. आता त्यांचे जे नवीन फोटोज समोर आले आहेत, त्यात दोघे लग्नानंतर पहिल्यांदा एकमेकांना किस करताना दिसत आहेत. हे फोटोज त्यांच्या ख्रिश्चन पद्धतीने झालेल्या लग्नाचे आहेत. ख्रिश्चन पद्धतीनुसार, पती-पत्नी म्हणून एकमेकांचा स्वीकार केल्यानंतर वर-वधू एकमेकांचे चुंबन घेतात. निकयांकाचे 1 डिसेंबर रोजी जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये लग्न झाले होते. यावेळी कपलने  डिझायनर राल्फ लॉरेनचा आउटफिट परिधान केला होता. ख्रिश्चन पद्धतीनंतर 2 डिसेंबर रोजी हे दोघे हिंदू पद्धतीनुसार विवाहबद्ध झाले. 


7 दिवसांनी परतले मुंबईत...  
- प्रियांका चोप्रा आणि निक जोनास 29 नोव्हेंबर रोजी मुंबईहून जोधपूरला पोहोचले होते. येथे चार दिवस लग्नाचे फंक्शन पार पडले. त्यानंतर हे दोघे कुटुंबीयांसोबत दिल्लीला रवाना झाले होते. 4 डिसेंबर रोजी दिल्लीत त्यांचे रिसेप्शन झाले. या पार्टीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती होती. रिसेप्शनच्या दुस-या दिवशी म्हणजे 5 डिसेंबर रोजी हे दोघे दिल्लीहून मुंबईत आले आहेत. बुधवारी रात्री हे दोघे मुंबई विमानतळावर दिसले. यावेळी प्रियांका नाइट अटायरमध्ये दिसली तर निकने सूट घातला होता. 


पुढील स्लाईड्सवर बघा, ख्रिश्चन पद्धतीने पार पडलेल्या लग्नानंतर एकमेकांना किस करतानाचे प्रियांका-निकचे नवीन फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...