आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईः अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची आज (18 ऑगस्ट) मुंबईत एंगेज्मेंट पार्टी होणार आहे. यासाठीची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. आज रात्री होणा-या पार्टी आधी सकाळी प्रियांकाची रोका सेरेमनी पार पडली. प्रियांकाच्या घरी आज सकाळी आठच्या सुमारास आलेल्या पंडितांनी पूजा झाल्यानंतर दोघांची रोका सेरेमनी केली. प्रियांका आणि निकच्या रोका सेरेमनीचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये प्रियांका यलो कलरच्या लहेंग्यात तर निक व्हाइट कलरच्या शेरवानीत दिसतोय. कपलच्या रोकासाठी परिणीती चोप्रा सर्वप्रथम प्रियांकाच्या घरी पोहोचली. प्रियांकाच्या घरी पार पडलेल्या रोका सेरेमनीच्या पूजेत निकचे आईवडीलही सहभागी झाले. निक आणि त्याचे आईवडील डेनिस आणि केविन या सेरेमनीसाठी गुरुवारीच मुंबईत दाखल झाले. संध्याकाळी होणा-या पार्टीचे प्रियांकाच्या नातेवाईक आणि मित्रांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे.
रात्री होणार एंगेज्मेंट पार्टी...
- प्रियांका-निकची एंगेज्मेंट पार्टी शनिवारी रात्री आयोजित करण्यात आली आहे. या पार्टीत रणवीर सिंह, कंगना रनोट, आलिया भट, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, अनुराग कश्यप, संजय लीला भन्साळींसह अनेक सेलेब्स सहभागी होणार आहेत.
सलमान-शाहरुखसह हे सेलेब्स राहणार पार्टीत गैरहजर...
- सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'भारत' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी माल्टा येथे आहे. यामुळे तो प्रियांकाच्या पार्टीत सहभागी होऊ शकणार नाही. प्रियांकाने सुरुवातीला हा चित्रपट साइन केला होता. पण ऐनवेळी तिने यातून काढता पाय घेतला. यामुळे सलमान तिच्यावर सध्या नाराज आहे.
- शाहरुख खान प्रियांकाच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. पण तोदेखील या पार्टीत सहभागी होऊ शकणार नाही. कारण तो सध्या त्याच्या आगामी 'जीरो' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे, तर त्याचे कुटुंबीय सध्या कॅलिफोर्नियात आहे. त्यामुळे खान कुटुंबातून कुणीही या पार्टीत सहभागी होणार नाही.
- रणबीर कपूर सध्या बुल्गारियामध्ये त्याच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. त्यामुळे त्याचे पार्टीत सहभागी होणे अशक्य आहे. दोघांनी 'अनजाना-अनजानी' या चित्रपटात एकत्र काम केले होते.
- अनुष्का प्रियांकाची जवळची मैत्रीण आहे. पण तीसुद्धा या पार्टीत सहभागी होऊ शकणार नाहीये. कारण सध्या ती लंडनमध्ये आहे.
अलीकडेच चर्चेत आली प्रियांकाची एंगेज्मेंट रिंग...
- अलीकडेच प्रियांका चोप्रा फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या पार्टीत सहभागी झाली होती. यावेळी तिच्या हातात असलेल्या डायमंड रिंगची जास्त चर्चा झाली. ही अंगठी प्रियांकाच्या साखरपुड्याची असून त्याची किंमत तब्बल 1 कोटी 40 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.