आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Chopra And Nick Jonas Wedding Celebrations:Salman Khan Sister Arpita Khan And Bollywood Singer Manasi Scott Land Jodhpur For Priyanka Marriage

प्रियांका-निकच्या लग्नात सहभागी होण्यासाठी जोधपूरमध्ये पोहोचली सलमानची बहीण, अर्पिताशिवाय खान फॅमिलीतून कुणीही दिसले नाही, बॉलिवूडची एक सिंगरही पोहोचली लग्नस्थळी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास येत्या 2 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्नात सहभागी होण्यासाठी प्रियांकाची बेस्ट फ्रेंड आणि सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खान जोधपूरमध्ये पोहोचली आहे. अर्पितासोबत यावेळी तिचा दोन वर्षांचा मुलगा आहिल होता. या दोघांव्यतिरिक्त खान कुटुंबातून इतर कुणीही अर्पितासोबत नव्हते. प्रियांका आणि अर्पिता खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघीही फॅमिली फंक्शन्समध्ये कायम एकत्र दिसत असतात. अर्पिताशिवाय बॉलिवूड गायिका मानसी स्कॉटही लग्नस्थळी दाखल झाली आहे. एअरपोर्टवर मानसी रफ अँड टफ लूकमध्ये दिसली. बातम्यांनुसार, मानसी प्रियांकाच्या लग्नात परफॉर्म करणार आहे. प्रियांका आणि निक ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत. लग्नात केवळ 80 पाहुण्यांंना आमंत्रित करण्यात आले आहे. लग्नाचे बॉलिवूड सेलिब्रिटींना निमंत्रण देण्यात आलेले नाही.

 

प्रियांकाची एक क्लोज फ्रेंड लग्नात होऊ शकणार नाही सहभागी.... 

- यूएस वीकलीच्या एका रिपोर्ट्सनुसार, प्रियांकाची अतिशय जवळची मैत्रीण आणि इंग्लंडच्या शाही घराण्याची सून मेगन मर्केल तिच्या लग्नात सहभागी होऊ शकणार नाही. मेगल मार्कल प्रेग्नेंट असल्याने ती लग्नात सहभागी होऊ शकणार नाहीये.

- याचवर्षी मे महिन्यात मेगनचे प्रिन्स हॅरीसोबत लग्न झाले. प्रियांका या शाही विवाहसोहळ्यात सहभागी झाली होती. यावेळी प्रियांकाच्या रॉयल लूकची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती.

 

4 दिवस चालणार प्रियांका-निकच्या लग्नाचे फंक्शन...  
- प्रियांका-निकच्या लग्नाचे फंक्शन्स चार दिवस चालणार आहेत. संगीत-मेंदी सेरेमनीनंतर 30 नोव्हेंबर रोजी कॉकटेल पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत सनम बँडने परफॉर्मन्स दिला. सनम बँड हा इंडियन पॉप रॉक बँड आहे. यामध्ये  सनम पुरी (सिंगर), समर पुरी (गिटारिस्ट-सिंगर), वेंकट सुब्रामणियम (बैस गिटार- सिंगर) आणि केशव धनराज (ड्रमर-सिंगर) हे चार मेंबर्स आहेत.
- 1 डिसेंबर रोजी प्रियांका आणि निकला हळद लागणार आहे आणि 2 डिसेंबर रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकतील. 

 

गेस्टला देण्यात आले लगेज टॅग... 
- पीसी-निकच्या लग्नात सहभागी होणा-या पाहुण्यांना त्यांचे लगेज बांधण्यासाठी स्पेशल टॅग देण्यात आले आहेत. यावर पीसी-निकच्या नावाचे आद्याक्षर लिहिण्यात आले आहे. याशिवाय गेस्टला की-कार्ड देण्यात आले असून त्यावर एनपी असे नमूद करण्यात आले आहे. या दोघांच्या लग्नात सहभागी होणा-या पाहुण्यांना स्पेशल गिफ्टही देण्यात येणार आहे.
- दीपवीरच्या लग्नाप्रमाणेच निकयांकाच्या लग्नात मोबाइलवर बंदी आहे. लग्नात सहभागी होणा-या पाहुण्यांना मोबाइलमध्ये फोटो क्लिक न करण्याची विनंती करण्यात आली आहे.
- पॅलेसला बाहेरुन लायटिंगने सजवण्यात आले आहे. तर इनसाइड एरियालाही फूलांनी आणि झुमरने सजवण्यात आले आहे.
- लग्नानंतर प्रियांका-िनक दोन रिसेप्शन देणार आहेत. 4 डिसेंबर रोजी दिल्लीत रिसेप्शन होणार असून मुंबईतील रिसेप्शनल पार्टीची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मुंबईतील रिसेप्शनला बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे.  

बातम्या आणखी आहेत...