PHOTOS : खास / PHOTOS : खास व्यक्तींसाठी प्रियांका-निकने ठेवले होते रिसेप्शन, दिसला दोघांचा रोमँटिक अंदाज

जुहूस्थित हॉटेल जे. डब्ल्यू मॅरियट येथे प्रियांका-निकचे रिसेप्शन झाले.

Dec 20,2018 04:36:00 PM IST

अभिनेत्री प्रियांका चोप्रा अमेरिकन गायक निक जोनास यांचा राजस्थानमधल्या जोधपुर येथे 1 आणि 2 डिसेंबरला ख्रिश्चन आणि पारंपरिक भारतीय पद्धतीने विवाहसोहळा संपन्न झाला. लग्नाच्या 19 दिवसांनी या दोघांनी मुंबईत वेडिंग रिसेप्शन ठेवले होते. या रिसेप्शनला प्रियांकाचा मुंबईतील अत्यंत जवळचा मित्रपरिवार आणि काही मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. या पार्टीसाठी प्रियांकाने प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीचा लहेंगा परिधान केला होता. या सोहळ्यासाठी डिझायनर निता लुल्ला, अँकर मलिष्कादेखील उपस्थित होती . प्रियांकाने मुंबईत 20 डिसेंबर रोजी आणखी एका रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले आहे. ही पार्टी फक्त बॉलिवूडसाठी असणार आहे. या पार्टीत अमिताभ बच्चनसह अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत.

X