आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंका चोप्रा अन् झायरा वसीमचा 'द स्काय इज पिंक'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट निर्मात्या सोनाली बोस यांचा प्रियंका चोप्रा, फरहान अख्तर आणि झायरा वसीम अभिनीत चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. ज्यावर उपचारच नाही अशा आजाराने ग्रस्त व्यक्तीचे पात्र झायरा साकारत आहे. माता-पिता तिची सेवा करतात. १८ व्या वर्षीच तिचे निधन होते. मृत्यूपूर्वी प्रेरणादायी भाषणासाठी तिला अनेक ठिकाणी निमंत्रित केले जाते. तिचे भाषण ऐकून श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी येते तर कधी ओठांवर हसू. प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तर तिच्या आई-वडिलांच्या भूमिकेत आहेत. त्या धैर्यवान मुलीच्या माता-पित्यांनी सोनाली यांना तिच्यावर चित्रपट बनवण्याची विनंती केली होती. सोनाली बोस यांनी 'द स्काय इज पिंक'ची कथा लिहिली. प्रियंका चोप्राला ती इतकी आवडली की तिने सलमान खानचा 'भारत' सोडून या चित्रपटासाठी अभिनय करण्याचा निर्णय घेतला. करार मोडणे तसे लौकिकास उचित नसते. मात्र कधी-कधी कलाकाराला एखादी कथा इतकी भावते की त्या पात्राच्या प्रेमातच तो पडतो. प्रियांकाने या चित्रपटात आर्थिक गुंतवणूकही केली आहे. राज कपूर यांनी १ रुपया घेऊन हृषीकेश मुखर्जींच्या 'अनाडी'चे चित्रीकरण पूर्ण केले होते. शंकर-जयकिशन यांनी सदाबहार संगीत दिले तर शैलेंद्र-हसरत यांनी अविस्मरणीय गाणी लिहिली. प्रियंकाने अनुराग बसूच्या 'बर्फी'त मतिमंद मुलीची भूमिका केली होती. या अभिनयात तिने स्वत:ला इतके झोकून दिले की प्रेक्षकांना ती प्रियंकाच आहे, यावर बराच वेळ विश्वास बसला नाही. तिच्यासह रणवीर कपूर आणि सौरभ शुक्लाने लाजवाब अभिनय केला. दोन वेगळ्या विचारधारांच्या व्यक्ती एकत्र बसल्या होत्या. आकाशाकडे पाहून एकाने म्हटले, अवकाशात लाल रंग पसरला आहे. दुसरा म्हणाला पृथ्वी हरित झाली आहे. वॉल्ट व्हिटमॅन यांच्या ओळी आठवल्या, ' हरित रुपडे म्हणजे पृथ्वीवर पडलेले देवाचे जणू वस्त्र. त्याच्या एखाद्या कोनावर नाव कोरले आहे. ते आपण वाचू शकत नाही.' खरे तर रंग नैसर्गिक किमया. मात्र आपण त्याला चारित्र्य आणि धर्माशी जोडले. आता तर इंद्रधनुष्यातील एक रंग वगळण्याचा प्रयत्न सुरू आहे. हॉलीवूडमध्ये 'चिल्ड्रन ऑफ लेसर गॉड' विषयावरील चित्रपटांचे कौतुक होते. त्यातील कलाकारांना बहुतांश ऑस्कर पुरस्कार मिळतात. अमेरिकन जनतेला एखाद्या अपराध भावनेची बोच असावी. ही भावना पहिल्या अणुस्फोटानंतर जन्मली असावी. हा हल्ला अनावश्यक होता. कारण हुकूमशाहीचा कधीच पराभव झाला होता. हॉलीवूडमध्ये १९६७ पासून विज्ञानाला वाहिलेले चित्रपट बनतात. त्यात मानवी करुणाही असते. तंत्रज्ञान हे त्यांच्या यशाचे आणखी एक रहस्य. गेल्या काही वर्षांत प्रियंकाने भारतापेक्षा अमेरिकेत जास्त काळ व्यतीत केला. 'द स्काय इज पिंक' करण्याचे कदाचित हेही कारण असावे. अधिक वास्तव्य असलेल्या देशाच्या भूगोल, इतिहास आणि संस्कृतीने मानवी दृष्टिकोन प्रभावित असतो. संजय लीला भन्साळीच्या 'गुजारिश'मध्ये हृतिकने उपचार नसलेल्या आजारी व्यक्तीची भूमिका केली होती. मृत्युसमयी तो एक उत्सव आयोजित करतो. निकटवर्तीयांना आमंत्रित करतो. सोनाली बोसचा हा चित्रपट प्रियंका-फरहानसाठी आव्हानात्मक आहे. आपली मुलगी मृत्यूच्या जबड्यात जाताना ते क्षणोक्षणी पाहत आहेत. अशा प्रकारच्या मृत्यूची सावली निकटवर्तीयांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असते. जणू रुग्णाला समोरच्यांच्या चेहऱ्यावरच मृत्यू साक्षात दिसत असतो. या चित्रपटाला किती यश मिळते, हे लवकरच स्पष्ट होईल.