आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Chopra Appeared In Khaki Shorts, Social Media Users Said, 'did She Joined RSS ?'

खाकी शॉर्ट्समध्ये दिसली प्रियांका चोप्रा, सोशल मीडिया यूजर्स म्हणाले, 'आरएसएस जॉईन केले का ?'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : प्रियांका चोप्रा अनेकदा आपल्या फॅशन सेंसमुळे चर्चेत राहाते. अशातच ती न्यूयॉर्कमध्ये पती निक जोनससोबत एका आउटिंगवर स्पॉट केले गेले. यादरम्यान प्रियांका खाकी शॉर्ट्स, ब्लॅक ब्लाउज आणि ब्लू कोर्ट आणि ब्लॅक बूट्समध्ये दिसली. प्रियांका या लुकमध्ये खूप ग्लॅमरस दिसली. पण सोशल मीडियावर तिच्या लुकला ट्रोलर्सने खूप ट्रोल केले. प्रियांकाने खाकी शॉर्ट्स घातल्यामुळे अनेक मीम्स व्हायरल व्हायला सुरुवात झाली आणि लुक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या वर्कर्सने घालणाऱ्या खाकी शॉर्ट्सपासून प्रेरित असल्याचे सांगितले. 

 

सोशल मीडिया यूजर्सने अशी उडवली खिल्ली...  
- प्रियांकाने आरएसएस जॉईन केले आहे का ?
- आरएसएसची प्रमुख मीटिंग अटेंड करून निघालेली प्रियांका चोप्रा. 

 

 

'द स्काय इज पिंक' आहे आगामी चित्रपट... 
डिसेंबर 2018 मध्ये अमेरिकन सिंगर निक जोनससोबत लग्न केल्यानंतर प्रियांका बॉलिवूड चित्रपट 'द स्काई इज पिंक' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले आहे. याआधी प्रियांका सलमान खान स्टारर 'भारत' ऐन वेळी सोडल्यामुळे चर्चेत होती.