आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाने भलेही 11 वर्षांनी लहान आहे निक.. पण कमाईच्या बाबतीत प्रियांकापेक्षाही वरचढ..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडची आघाडी अभिनेत्री प्रियांका चोप्रा अमेरिकन सिंगर निक जोनासच्या प्रेमात पडली आहे. आज (18 ऑगस्ट) दोघांची मुंबईत रोका सेरेमनी पार पडली. त्यानंतर संध्याकाळी दोघे मुंबईतील एका पंचातारांकित हॉटेलमध्ये एक जंगी पार्टी देणार आहेत. या पार्टीत रणवीर सिंह, कंगना रनोट, आलिया भट, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, अनुराग कश्यप, संजय लीला भन्साळींसह अनेक सेलेब्स सहभागी होणार आहेत. प्रियांकाने भारतीय व्यक्तीची नव्हे तर परदेशी निकची जोडीदाराच्या रुपात निवड केली आहे. पण हा निक जोनास कोण आहे? एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत त्याचे नाव किती आहे? हे तुम्हाला ठाऊक आहे का? चला तर मग जाणून घेऊयात निकविषयी सर्वकाही... 

 

- निक जोनासचे पूर्ण निकोलस जेरी जोनास आहे. 16 सप्टेंबर 1992 रोजी टेक्सासच्या डालास शहरात निकचा जन्म झाला. निक आता 25 वर्षांचा तर प्रियांका 36 वर्षांची आहे. 

 

- निकचे वडील केविन जोनास हे साँग रायटर आणि म्युझिशिअन आहेत. तर आई मिलर जोनास या सिंगर आणि साइन लँग्वेजच्या शिक्षिका आहेत. 


- निक हा आंतरराष्ट्रीय गायक आणि अभिनेता आहे. सेलिब्रिटी स्पीकर्स ब्युरोनुसार, निक जोनासची फीस 50 हजारांपासून ते 1 लाख डॉलरच्या घरात आहे. म्हणजेच तो एका शोसाठी 35 लाखांपासून ते 69 लाखांपर्यंत मानधन घेतो.

 

निक जोनासचे हाइएस्ट सेलिंग अल्बम्स...

 

अल्बम यूनिट
जोनास ब्रदर्स (2007) 20 लाख यूनिट
इट्स अबाउट टाइम (2007) 17.50 लाख यूनिट
निक जोनास (2014) 2.25 लाख यूनिट
लास्ट इयर वॉज काम्प्लीकेटेड (2016) 66 हजार यूनिट
 
प्रियांका आणि निक जोनासची संपत्ती

प्रियांका आणि निक यांच्या संपत्तीविषयी बोलायचे झाल्यास, सेलिब्रिटी नेटवर्थ वेबसाइटनुसार, निक जोनासजवळ प्रियांकापेक्षा अधिक संपत्ती आहे. प्रियांकांची संपत्ती 16 मिलियन डॉलर (110 कोटी रुपये) आहे. तर निक जोनासची नेटवर्थ 25 मिलियन डॉलर (172 कोटी रुपये) आहे.

 

निकजवळ आहे हॉलिवूडमध्ये 25 कोटींचा बंगला...
निक जोनासजवळ लॉस एंजिलिस (हॉलिवूड) मध्ये 3175 स्वे. फूटमध्ये बनलेला एक आलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत 3.7 मिलियन डॉलर (25 कोटी रुपये)आहे. याशिवाय त्याच्याजवळ हॅम्पटन येथील एक बंगला आहे.

 

निकचे कार कलेक्शन...
निकजवळ Ford Mustang आहे. या कारची किंमत 45 लाख रुपये आहे. याशिवाय त्याच्या कार कलेक्शनमध्ये 24 लाख रुपये किंमतीची Chevy Camaro Convertible, 24 लाखांची Dodge Charger, 15 लाखांची Ford Thunderbird या कार आहेत.

 

प्रियांकाजवळ 55 कोटींची रिअल इस्टेट प्रॉपर्टी... 

प्रियांका चोप्रा एका चित्रपटासाठी 12 कोटी रुपये मानधन घेते. याशिवाय तिची एंडोर्समेंट फीससुद्धा पाच कोटींच्या घरात आहे. प्रियांकाजवळ मुंबई आणि पुण्यात रिअल इस्टेट प्रॉपर्टी असून त्याची किंमत 55 कोटी इतकी आहे. तर कार कलेक्शनमध्ये बीएमडब्ल्यू, मर्सडीज आणि ऑडी या लग्झरी कार आहेत. तिच्या या आलिशान गाड्यांची एकुण किंमत चार कोटी आहे.

 

बातम्या आणखी आहेत...