Home | Gossip | priyanka chopra came to india for her brothers marriage, enjoyed dinner with family

भावाच्या लग्नासाठी भारतात आली प्रियांका चोप्रा, इंस्टाग्रामवर शेयर केले कुटुंबासोबतचे काही फोटोज

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 28, 2019, 01:41 PM IST

फॅमिलीसोबत डिनर एन्जॉय करताना दिसली... 

 • priyanka chopra came to india for her brothers marriage, enjoyed dinner with family

  बॉलिवूड डेस्क : प्रियांका चोप्रा आपला भाऊ सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नासाठी भारतात आली आहे. गुरुवारी तिने आपल्या कुटुंबासोबत डिनर केले. या फॅमिली डिनरचे फोटो प्रियांकाने आपल्या इंस्टाग्रामवर शेयर केले आहेत. फोटोमध्ये तिची आई मधु चोप्रा, भाऊ सिद्धार्थ आणि तिचे काही नातेवाईक दिसत आहेत.

  सासऱ्यांनी केले प्रियांकाच्या फोटोवर कमेंट...
  यावेळी प्रियांका हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. ड्रेससोबतच तिने हिरव्या रंगाचे फुटवेयर घातले आहेत. कुटुंबासोबत ती खूप रिलॅक्स दिसत आहे. प्रियांकाने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'मुंबई डायरीज'. या फोटोवर प्रियांकाचे सासरे केविन जोनसनेदेखील कमेंट केले आहे. केविनने लिहिले, 'लव्ह टू यूअर फॅमिली'

  View this post on Instagram

  Mumbai diaries.. #family ❤️

  A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on Apr 25, 2019 at 11:58am PDT

  कजिन परिणीतिनेदेखील शेयर केले फोटो...
  परिणीति चोप्रानेदेखील प्रियांकासोबतच एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये प्रियांकाने आपल्या कडेवर एक कुत्र्याचे पिल्लू घेतले आहे. परिणितीने फोटो शेयर करून लिहिले, 'भेट बेली चोप्राला.. प्रत्येक पंजाबी आंटीसारखे मीदेखील या पपीचे नाव ठेवले आहे.'

  आणखी एका हॉलिवूड फिल्ममध्ये दिसणार प्रियांका...
  प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर तर तिने अशातच तिची बॉलिवूड फिल्म 'द स्काय इज पिंक' चे शूटिंग पूर्ण केले आहे. या फिल्मनंतर ती लवकरच आणखी एका प्रोजेक्टवर काम सुरु करणार आहे. ती हॉलिवूड स्टार मिंडी कलिंगसोबत एका फिल्ममध्ये काम करेल. मिळालेल्या माहितीनुसार, ही फिल्म बिग फॅट इंडियन वेडिंग्सवर आधारित आहे.

 • priyanka chopra came to india for her brothers marriage, enjoyed dinner with family

Trending