Home | Party | Priyanka Chopra Celebrate News Year With In Laws PC Kiss Nick Jonas

प्रियांका चोप्राने माहेर आणि सासरच्या लोकांसोबत केले नवीन वर्षाचे सेलिब्रेशन, दिर-जाऊसोबत वाइन पिताना दिसली देसी गर्ल: Video

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 02, 2019, 02:45 PM IST

10 वर्षे लहान पती निकला Kiss करताना दिसली प्रियांका

 • Priyanka Chopra Celebrate News Year With In Laws PC Kiss Nick Jonas

  एन्टटेन्मेंट डेस्क. प्रियांका चोप्राने माहेर आणि सासरच्या लोकांसोबत मिळून न्यू ईयर सेलिब्रेशन केले. ती सध्या स्विट्जरलँडमध्ये आहे. न्यू ईयर सेलिब्रेशन करताना प्रियांका-निकचे काही फॅमिली फोटोज समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये प्रियांका जाऊ जोफी टर्नर आणि दिर जो जोनाससोबत वाइन पिताना दिसतेय. तर एका व्हिडिओमध्ये प्रियांका आपले माहेर आणि सासरच्या लोकांसोबत मस्ती मूडमध्ये दिसतेय.

  पतीला केले Kiss
  - प्रियांका आणि निकचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दोघ एकमेकांना किस करताना दिसत आहेत. यापुर्वी हे दोघं ओमान येथे हनीमूनसाठी गेले होते. हनीमूनवरुन परतल्यानंतर प्रियांका 'द स्टाय इज पिंक'ची शूटिंग पुर्ण करण्यासाठी अहमदाबाद येथे गेली होती.

  प्रियांकाने शेअर केल्या या गोष्टी
  इंटरनॅशनल मॅगझीन पीपल्सला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने सांगितले होते की, 'लग्नापुर्वी मी खुप जास्त घाबरलेले होते. पण मी निकला पाहिले तर माझी भिती गायब झाली.' ती म्हणाली होती की, 'प्रत्येक मुलीचे स्वप्न असते की, तिने आपल्या लग्नात राजकुमारीसारखे दिसावे. पण मी स्वतःची अशी काहीच प्लानिंग केली नव्हती.'

  - प्रियांका-निकने 1-2 डिसेंबरला ख्रिश्चन आणि हिंदू पध्दतीने जोधपुरच्या उमैद भवन पॅलेसमध्ये लग्न केले होते. ख्रिश्चन वेडिंगनंतर दोघांनी 18 फूटांचा केक कापला होता. हा केक निकच्या पर्सनल शेफने बनवला होता. विशेष म्हणजे लोक चाकूने केक कापतात पण निक प्रियांकाने तलवारीने केक कापला होता.

Trending