आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री आणि देसी गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियांका चोप्राने 18 जुलैला आपला 37 वा वाढदिवस साजरा केला. लग्नानंतरचा प्रियांकाचा हा पहिला बर्थडे होता. प्रियांकाचा हा वाढदिवस विशेष बनवण्यासाठी पती निक जोनसने कोणतीच कसर सोडली नाही. विशेष गोष्ट ही आहे की, प्रियांकाचा हा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी तिची आई आणि चुलत बहीण परिणीती चोप्रादेखील पोहोचली होती.
बर्थडेला प्रियांका चोप्राला निक जोनसने सोशल मीडियावर एका वेगळ्या स्टाईलमध्ये विश केले होते. प्रियांकाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून निकने प्रियांकासाठी एक सुंदर कॅप्शन लिहिले होते, निकने लिहिले, 'माझ्या जगातील प्रकाश, माझे संपूर्ण हृदय, आय लव्ह यू बेबी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.'
प्रियांका चोप्राने आपला वाढदिवस यावर्षी मियामी बीचवर साजरा केला. या खास प्रसंगी प्रियांकाने लाल रंगाचा शिमरी ड्रेस घातला होता ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
या फोटोजमध्ये मधु चोप्रा, परिणीती चोप्रा, निक जोनस आणि प्रियांका यांच्याव्यतिरिक्त अनेक लोक दिसत आहेत. काही फोटोजमध्ये निक प्रियांकाचे फोटोज काढताना दिसत आहे तर काही फोटोजमध्ये दोघे एकमेकांना ड्रिंक पाजताना दिसत आहेत. प्रियांकाच्या बर्थडेसाठी निक जोनसने मियामी बीचवर ग्रँड पार्टी दिली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.