आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Chopra Celebrates Her First Karva Chauth After Marriage, Photo Goes Viral

प्रियांका चोप्राने साजरी केली लग्नानंतरची पहिली करवा चौथ, व्हायरल होत आहेत देसी गर्लचे फोटो   

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : काल संपूर्ण  देशामध्ये करवा चौथ हा सण उत्साहात साजरा केला गेला. सर्व सुवासिनी महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास केला होता. सामान्य लोकांप्रमाणेच बॉलिवूडकरांनीही करवा चौथ उत्साहात साजरी केली. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने करवा चौथचे आपले काही फोटोज शेअर केले आहेत. तिची लग्नानंतरची ही पहिलीच करवा चौथ होती. प्रियांकाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती आपल्या फ्रेंड्ससोबत मस्ती करताना दिसत आहे. फोटोमध्ये प्रियांका चोप्रा पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे. भांगेत भरलेल्या सिंदूरमुळे प्रियांका चोप्राचा लूक खूपच जबरदस्त दिसत आहे. हा फोटो शेअर करून प्रियांका चोप्राने लिहिले, "मी आणि माझे मित्र, करवा चौथ 2019." 

बातम्या आणखी आहेत...