आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान मुलासोबत खेळतानाचा प्रियंकाचा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी केला प्रश्नाचा भडिमार, एकाने विचारले- तु गरोदर आहेस का तर दुसऱ्याने विचारले हा मुलगा तुझा आहे का...?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- परदेशी ब्वॉयफ्रेंडसोबत लग्ना केल्यानंतर प्रियंका जास्तीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी प्रियंका तिच्या प्रेगन्सीमुळे खूप चर्चेत होती, तर काही दिवसांपूर्वी तिने एका इंटरव्हूमध्ये तिच्या सेक्स लाइफवर बिंधास्तपणे भाष्य केले होते. पण सध्या प्रियंका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. खरतर, प्रियंकाने सोशल मीडियावर एका लहान मुलासोबत खेळतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, शिवाय नेटकरी प्रियंकाला अनेक प्रश्न विचारत आहेत.


प्रियंकासोबत मुलाला पाहून एका युझरने प्रश्न विचारला- तु प्रेग्नंट आहेस का? तर दुसऱ्या एकाने विचारले- मुलगा तुझा आहे का? फोटो शेअर करताना प्रियंकाने सोबत कॅप्शन लिहीले होते- ''Okay pls. Just stop !'' काही दिवसांपूर्वी प्रियंका एका ड्रेसमध्ये स्पॉट झाली होती, ज्यात तिचा बेबी बंप दिसत होता. त्यानंतर ती आपली आई मधु चोप्रासोबत एका रूग्णालयातून बाहेर येताना दिसली होती. त्यानंतर चर्चेला उधाण आले होते की, प्रियंका गरोदर आहे. पण नंतर मधु चोप्राने स्पष्ट केले होते की, ती तिच्या नातलगाला भेटालया आली होती.


खूप सारे मुलं हवे आहेत- प्रियंका
लग्नापूर्वी तिने एका इंटरनॅशनल मॅगझीनला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटले होते की- ''मी फॅमिली आणि मुलांवर विश्वास ठेवते. जर देवाच्या मनात असेल तर खूप सारे मुलं जन्मा घालेल, पण कोणासोबत ते अजून ठरलेले नाहीये.'' त्यासोबत ती म्हणाली होती की, तिला रोमान्स करायला आवडते. 

बातम्या आणखी आहेत...