आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरपुड्यानंतर होणारा नवरा निक आणि सासु-सास-यांसोबत अनाथाश्रमात पोहोचली प्रियांका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: प्रियांका चोप्राने शनिवारी बॉयफ्रेंड अमेरिकी सिंगर निक जोनाससोबत साखरपुडा केला. यानंतर रविवारी ती आपला होणारा नवरा निक आणि सासु-सासरे डेनिस आणि केविन जोनास सीनियर यांना घेऊन अंधेरी(वेस्ट) येथेल सेंट कॅथरीन अनाथाश्रमात पोहोचली. निकने इंस्टाग्रामवर एक व्हिजिट व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये प्रियांका तिच्या 'गुंडे' चित्रपटातील 'तूने मारी एंट्रिया' वर मुलांसोबत डान्स करताना दिसतेय. त्याने व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “St Catherine’s Orphanage today. My heart is full @priyankachopra.” 


रविवारी रात्री अमेरिकेत परतले निक आणि त्याचे पालक 
- रविवारी रात्री निक आणि त्याचे पालक अमेरिकेत परतले. ते मुंबई एयरपोर्टवर दिसले. मीडियाला पाहून निकने स्माइल दिली आणि त्यांचे अभिवादन स्विकारले. साखरपुड्यासाठी निक गुरुवारी पालकांसोबत मुंबईत पोहोचला होता. शनिवारी सकाळी प्रियांकासोबत त्याचा साखरपुडा झाला आणिरात्री प्रियांकाच्या जुहू येथील घरात एक लहानशी पार्टीही झाली. यामध्ये बॉलिवूडमधून आलिया भट, संजय लीला भन्साळी आणि सिध्दार्थ रॉय कपूरसोबतच निवडक सेलेब्स स्पॉट झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...