आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईः बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा शनिवारी तिचा बॉयफ्रेंड निक जोनाससोबत साखरपुडा झाला. त्यानंतर रविवारी प्रियांकाने भावी पती निक, सासूबाई डेनिस आणि सासरे केविन जोनास यांच्यासोबत अंधेरीस्थित सेंट कॅथरीन अनाथाश्रमाला भेट दिली. निकने या भेटीचा एक व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये प्रियांका तिच्या 'गुंडे' या चित्रपटातील 'तूने मारीं एंट्रियां' या गाण्यावर मुलांसोबत थिरकताना दिसतेय. व्हिडिओसोबत निकने लिहिले,
“St Catherine’s Orphanage today. My heart is full @priyankachopra.”
रविवारी रात्री आईवडिलांसोबत अमेरिकेला परतला निक...
- रविवारी रात्री निक त्याच्या आईवडिलांसोबत अमेरिकेला परतला. एअरपोर्टवर मीडियाला बघून निकने अभिवादन केले. साखरपुड्यासाठी निक गुरुवारी आईवडिलांसोबत मुंबईत आला होता. शनिवारी सकाळी रोका सेरेमनीनंतर संध्याकाळी प्रियांकाच्या घरी एका छोटेखानी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आलिया भट, संजय लीला भन्साळी आणि सिद्धार्थ रॉय कपूरसह निवडक सेलेब्स सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.