आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासरच्या लोकांसोबत व्हॅकेशन एन्जॉय करताना बोटवर जबरदस्त नाचली प्रियांका चोप्रा, दीर-जेठ आणि होणाऱ्या जावेसोबत केले कडक डान्स मूव्हज, व्हायरल होत आहे व्हिडीओ 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : प्रियांका चोप्रा सध्या तिच्या सासरच्या मंडळींसोबत मियामीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. हॉलिडे एन्जॉय करतानाचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातीलच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रियांका खूप मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. पीसीचा पती निक जोनस आपल्या भावांसोबत 'सकर' हे गाणे म्हणत आहे आणि प्रियांका आपली होणारी जाऊ सोफी टर्नरसोबत डान्स करत आहे. प्रियांकाच्या लग्नाला 4 झाले आहेत, पण अजूनही ती व्हॅकेशन मोडमधून बाहेर आलेली नाही. 

- निक जोनस ब्रदर्सच्या 'सकर' मध्ये पीसी आणि तिची जाऊ सोफी टर्नर यादेखील दिसल्या होत्या. हे गाणे बिलबोर्ड हॉट 100 सॉन्ग चार्टमध्ये 1 वर पोहोचले होते. या गाण्याच्या यशामुळे प्रियांका खूप खुश होती आणि तिच्या या आनंदाला पती निकने दुप्पट केले होते. निकने पत्नीला एक लग्झरियस कार मर्सिडीज मेबॅक गिफ्ट केली होती. या कारची किंमत सुमारे 2.5 कोटी रुपये आहे. गिफ्टमध्ये मिळालेल्या कारचा फोटो प्रियांकाने आपल्या इंस्टाग्रामवर देखील शेयर केला होता. 

बातम्या आणखी आहेत...