आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नात हेलिकॉप्टरने ग्रांड एंट्री करणार प्रियांका, मिळतात या सुविधा आणि येतो एवढा खर्च

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. प्रियांका चोप्रा आणि निक जोनसच्या लग्नाविषयी अनेक बातम्या समोर येत आहे. हे लग्न 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरच्या काळात होणार असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. निक आणि प्रियांकाचे लग्न उदयपुरच्या उम्मेद भवनामध्ये होणार आहे. काही दिवसांपुर्वी प्रियांकाची आई येथे आली होती. लग्नाविषयी नवीन अपडेट म्हणजे प्रियांका-नीक वेडिंग वेन्यूपर्यंत चॉपरने पोहोचणार आहेत. लग्नात सहभागी होणारे पाहुणेही जोधपुर एयरपोर्टवरुन चॉपरमध्ये स्वार होऊन डायरेक्ट वेडिंग वेन्यूपर्यंत पोहोचणार आहेत. पॅलेसमध्ये एक हॅलीपॅडही तयार केला जात आहे. 

 

रिपोर्ट्सनुसार, मेवाड हेलिकॉप्टर सर्व्हिसव्दारे प्रियांका-निक आणि तिच्या फ्रेंड्ससाठी सर्व्हिस प्रोव्हाइट केली जात आहे असे कन्फर्म झाले आहे. 29 नोव्हेंबर आणि 3 डिसेंबरसाठी चॉपर बुक करण्यात आले आहे. जोधपुर एयरपोर्टवरुन भवन पॅलेसपर्यंत पाहूण्यांना पोहोचवण्यासाठी हे चॉपर 5-6 फे-या मारणार आहे. हे चॉपर बुक करण्यासाठी किती खर्च येतो याविषयी आम्ही कंपनीसोबत बातचित केली. यासोबतच चॉपरमध्ये कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात हेसुध्दा जाणुन घ्या. 

 

कमीत कमी दिड लाख रुपये 
- कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले की, उदयपुरच्या 40 किमी रेंजमध्ये कुणी चॉपर बुक केले तर त्यासाठी दिड लाख रुपये खर्च येतो. यामध्ये हेलिपॅडपासून फूल आणि परमीशनपर्यंतची सर्व जबाबदारी कंपनीची असते.
- जर उदयपुरबाहेर जाण्यासाठी चॉपर बुक केले तर याचा चार्ज वाढतो. चॉपरने एंट्रीचा कमीत कमी खर्च दिड लाख रुपये आहे. यासाठी पहिले बुकिंग करावी लागते. प्रियांका-निकने कोणते चॉपर बुक केले आहे हे कन्फर्म होऊ शकले नाही. 

 

अजून कोणत्या प्रकारच्या सुविधा देते कंपनी 
- उदयपुरमध्ये ही कंपनी जॉयराइड्सही करते. तुम्हाला आकाशातून उदयपुरचे सौंदर्य पाहायचे असेल तर तुम्ही जॉयराइड्ने याचा आनंद घेऊ शकता.
- तुम्हाला फोटोग्राफीचा शौक असेल तर तुम्ही आकाशातून उदयपुरच्या सौंदर्याचे फोटोजही काढू शकता.
- लग्नासाठी कंपनी स्पेशल पॅकेज देते. तुम्ही आकाशातून फूलांचा पाऊसही पाडू शकता. नवरदेव नवरीला हेलिकॉप्टरने मंडपात आणता येऊ शकते. या सर्व सुविधा कंपनीकडून दिल्या जातात.
- ही कंपनी उदयपुरचे कस्टमाइज्ड पॅकेजही ऑफर करते. यामध्ये तुम्ही आजुबाजूच्या ठिकाणांना हॅलिकॉप्टरने पाहू शकता. 

 

पॅकेज किती असते 
- एयर एडवेंचर टूर इंडियन्ससाठी 3250 रुपये असते. तर फॉरेनर्ससाठी 100 डॉलर असतात. यामध्ये 5 मिनिटांची राइड असते. 3250 रुपये प्रत्येकी व्यक्तीसाठी चार्ज असतो. प्रत्येक पॅसेंजरचे 10 लाख रुपये इंश्योरेंस यामध्ये असते. 
- Scenic Aravali टूरमध्ये भारतींयासाठी 5500 रुपयांचे चार्ज आहे. तर फॉरेनर्ससाठी 150 डॉलर चार्ज आहे. यामध्ये 10 मिनिटांची राइड केली जाते. 
- उदयपुरच्या लेक टूरमध्ये प्रत्येकी व्यक्तीचे चार्ज 6500 रुपये आहे. यामध्ये कमीत कमी 15 मिनिटांची राइड केली जाते. या ट्रिपसाठी फॉरेनर्सकडून 200 रुपये डॉलर प्रत्येकी व्यक्तीचे घेतले जातात.
- Scenic उदयपुर टूरमध्ये 30 मनिटांची राइड दिली जाते. यामध्ये प्रत्येकी व्यक्तीचे 12500 रुपये चार्ज केले जातात. फॉरेनरसाठी हा चार्ज 300 डॉलर(एक व्यक्ती) असतो. 
- यासोबतच तुम्ही प्रीमियम राइड, आउटडोर पॅकेज, वेडिंग पॅकेजसोबतच एमरजेंसी सर्विसेजसाठीही या कंपनीसोबत कॉन्टॅक्ट करु शकता. 

बातम्या आणखी आहेत...