आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकरच नववधुच्या रुपात दिसणा-या प्रियांकाचा असा आहे डायट प्लान, आठवड्यातून एक दिवस मनसोक्त खाते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. प्रियांका चोप्रा 2-3 डिसेंबरला अमेरिकी सिंगर निक जोनाससोबत विवाह बंधनात अडकणार आहे. प्रियांकाची गणना बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींमध्ये होते. प्रियांकाला खुप जास्त जिम करणे आवडत नाही. ती घरी तयार केलेल जेवण करणे पसंत करते. यामुळे ती फिट राहते आणि तिचे मेटाबॉलिजम चांगले राहते. ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक रुल्स फॉलो करते. 


हे आहे प्रियांकाचे फिटनेस सीक्रेट 
- प्रियांका स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये वेट ट्रेनिंग, मिक्स कार्डियो आणि योगा करते. जिममध्ये ट्रेडमिलवर 15 मिनिटे रनिंग करते. यासोबतच पुशअप्स करते.
- 20 ते 25 वेळा बेंच जम्प आणि 20 ते 24 वेळा रिवर्स क्रंचेस घेते. 20 ते 25 बायसेप एक्सरसाइज करते. ती जिममध्ये जाऊ शकली नाही तर रिनिंग आणि स्किपिंग करते.
- तणावापासून दूर राहण्यासाठी आणि फ्लेक्सिबिलिटीसाठी योगा करते. ती आसन, प्राणायम आणि मेडिटेशन नियमित करते.


ग्लोइंग त्वचेमागचे रहस्य 
ग्लोइंग स्किनसाठी प्रियांका दिवसभरात कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी पिते. लिक्विड डायट म्हणजे ज्यूस, नारळ पाणी भरपूर प्रमाणात घेते. फ्राइड आणि ऑयली पदार्थांपासून दूर राहते. आठवड्यातून एक दिवस आपल्या मनाप्रमाणे जेवण करते.

 

प्रियांकाचा डायट चार्ट 
- प्रियांका दिवसाची सुरुवात 2 अंडे, ओटमील आणि स्किम्ड मिल्कने करते.
- लंचमध्ये 2 चपात्या, डाळ, सलाद आणि फ्रूट्स घेते.
- संध्याकाळी ती सँडविच आणि स्प्राउट सलाद घेते.
- डिनरमध्ये सूप, ग्रिल्ड चिकन किंवा फिश आणि हिरव्या भाज्या खाते. 
- प्रत्येकी दोन ते तीन तासाला काहीना काही खात असते. यामुळे मेटाबॉलिजम मेंटेन राहते आणि एनर्जी लेव्हल टिकून राहते. 

 

बातम्या आणखी आहेत...