आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास त्यांच्या रिलेशनशिपविषयी लवकरच ऑफिशिअल घोषणा करु शकतात. प्रियांकाचे सध्या काही लेटेस्ट फोटोज समोर आले आहेत, त्यामध्ये तिच्या हातात एक डायमंड रिंग दिसत असून ही तिची एंगेजमेंट रिंग असल्याचे म्हटले जात आहे. प्रियांका आणि निक यांनी त्याच्या नात्याची अद्याप सार्वजनिकरित्या कबुली दिली नसली तरी पीसीच्या या रिंगची किंमत काय आहे, याचा खुलासा झाला आहे.
निकने साखरपुड्याला प्रियांकाला घातली 1.40 कोटींची रिंग...
- अलीकडेच प्रियांका चोप्रा बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या पार्टीत सहभागी झाली होती. यावेळी तिच्या अंगठीची जास्त चर्चा झाली.
- असे म्हटले जाते की, ही रिंग प्रियांकाच्या साखरपुड्याची आहे. या डायमंड अंगठीची किंमत $200,000 (सुमारे 1.40 कोटी रुपये) आहे.
- रिपोर्ट्सनुसार, हा दावा डब्ल्यू पी डायमंडचे प्रेसिडेंट एंड्रू ब्राउन यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर केला जातोय. काही दिवसांपूर्वीच प्रियांका भारतात परतली, तेव्हा दिल्ली एअरपोर्टवर तिने रिंग काढून ठेवली होती.
जुलैमध्ये झाला निक-प्रियांकाचा साखरपुडा...
- रिपोर्ट्सनुसार, प्रियांकाच्या 36 व्या वाढदिवशी म्हणजे 18 जुलै रोजी लंडनमध्ये तिचा साखरपुडा झाला. अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. जेव्हा प्रियांकाने अचानक सलमान खानचा 'भारत' हा चित्रपट सोडला, तेव्हा निकसोबत ती लग्न करणार असल्याची चर्चा सुरु झाली.
- दरम्यान प्रियांकाच्या आत्याने DainikBhaskar.com सोबत केलेल्या बातचीतमध्ये म्हटले की, ''आम्ही सगळेच दोघांच्या निर्णयाने आनंदी आहोत. 18 जुलै रोजी सगळे प्रियांकाच्या घरी हजर होते. यापूर्वी कुटुंबातील आम्ही काही जण अमेरिकेत निकच्या घरी गेलो होतो. लवकरच दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित केली जाईल."
आईवडिलांसोबत भारतात आला निक...
गुरुवारी निक त्याच्या आईवडिलांसोबत भारतात आला आहे. येत्या 18 ऑगस्ट रोजी प्रियांका आणि निक मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टी देत असून ही त्यांची साखरपुड्याची पार्टी असल्याचे म्हटले जात आहे.
प्रियांकापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे निक...
- 'क्वांटिको' या टीव्ही शोदरम्यान 35 वर्षीय प्रियांकाची भेट तिच्यापेक्षा वयाने दहा वर्षे लहान असलेल्या अमेरिकन सिंगर निक जोनास (25) सोबत एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती.
- डेटिंगच्या बातम्या समोर आल्यानंतर दोघांचे अनेक फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये प्रियांका निकसोबत क्वॉलिटी वेळ घालवताना दिसली होती.
- प्रियांका आणि निक यांच्यापैकी अद्याप एकानेही आपल्या नात्याची सार्वजनिकरित्या कबुली दिलेली नाही.
- प्रियांका अटलांटिक सिटीत झालेल्या निकच्या बहिणीच्या लग्नात सहभागी झाली होती. तिने फादर्स डेच्या दिवशी निकच्या वडिलांना इंस्टाग्रामवर फॉलो करायला सुरुवात केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.