आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Chopra Fiance Nick Jonas Before 13 Years Diagnosed With Diabetes And Priyanka Chopra Have Asthma Issue

प्रियांका चोप्राच्या होणा-या नव-याला आहे हा आजार, बालपणापासून आजपर्यंत असे जगतोय आयुष्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. प्रियांका चोप्राच्या होणा-या नव-याने आपल्या एका आजाराचा खुलासा केला आहे. निकने सोशल मीडियावर पोस्ट करुन सांगितले की, त्याला दिर्घकाळापासून डायबिटीज आहे. 13 वर्षांपुर्वी 17 नोव्हेंबरला त्याला या आजाराविषयी कळाले होते. तेव्हापासून आजपर्यंत तो सिस्टमेटिक रुटीन फॉलो करत आहे आणि त्याचे डायबिडीच नियंत्रणात आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत निकने सांगितले की, "आजपासून 13 वर्षांपासून मला डायबिटीज टाइप 1 असल्याचे कळाले होते. आजार कळाल्याच्या काही आठवड्यांनंतरचा हा पहिला फोटो आहे आणि दूसरा फोटो सध्याचा आहे. दूस-या फोटोमध्ये मी एकदम फिट आणि तंदरुस्त दिसतोय." या पोस्टवर सर्वात पहिले प्रियांकाने रिअॅक्ट केले. प्रियांका म्हणाली - तुझ्याविषयी सर्व काही स्पेशल आहे. डायबिटीजअसूनही आणि तो नसूनही.

 

बालपणापासून फॉलो करतोय डायट 
- निकने पोस्टमध्ये लिहिले, "माझ्या खाण्याच्या इच्छाशक्तीवर नियंत्रण करत, माझ्या आरोग्यावर लक्ष देत आणि नियमित एक्सरसाइज करत मी ब्लड शुगर चेक करत डायबिटीज कंट्रोल केले आहे."
- "आता मी या आजारावर पुर्णपणे नियंत्रण मिळवले आहे आणि यासाठी मी माझे कुटूंब आणि मित्रांचे आभार मानतो, कारण ते पाऊलोपावली माझ्यासोबत होते. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आयुष्य जगण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. तुमच्या शुभेच्छांसाठी आभारी आहे. हे माझ्यासाठी खुप महत्त्वाचे आहे."

 

निक प्रमाणेच आजाराशी लढतेय प्रियांका 
- डायबिटीज असूनही निकने हार मानली नाही. आज तो हॉलिवूडमध्ये सर्वात यशस्वी गायक आहे. त्याचप्रकारे प्रियांकानेही एका गंभीर आजाराचा सामना करत यश मिळवले आहे. 
- खुप कमी लोकांना माहिती असेल की, प्रियांकाला वयाच्या 5 व्या वर्षापासून दमा आहे. प्रियांकाने स्वतः मुलाखतीत सांगितले होते की, आईने तिला औषधांऐवजी इन्हेलर्स घेण्याचा सल्ला दिला. अनेक लोकांना वाटले होते की, तिला बालपणापासून याची सवय होईल. 
- तिने सांगितले की, दमा असूनही तिने आपले स्वप्न पुर्ण केले. प्रियांकाने आजाराविषयी ट्वीट केले होते की, "मला चांगल्या प्रकारे ओळखणा-या लोकांना मला दमा असल्याचे माहिती आहे. यामध्ये लपवण्यासारखे काही आहे का? दम्याने माझ्यावर काही प्रभाव पाडण्यापुर्वीच मी त्यावर नियंत्रण मिळवले. जोपर्यंत माझ्याकडे माझे इन्हेलर आहे, दमा मला माझे स्वप्न पुर्ण करण्यापासून रोखू शकत नाही."


हिंदू आणि क्रिश्चियन पध्दतीने होणार लग्न 
- प्रियांका आणि निक 2 डिसेंबरला दोन वेळा लग्न करणार आहे. हे कपल पहिले हिंदू आणि दूस-या वेळी क्रिश्चियन पध्दतीने लग्न करतील. प्रियांका-निकच्या लग्नाचे फंक्शन 30 नोव्हेंबरपासून सुरु होतील आणि 3 दिवस सुरु राहतील. 
- प्रियांकाची मेंदी आणि संगीत सेरेमनी 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला होईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका-निक दोघांनी या फंक्शनमध्ये त्यांच्या विदेशी मित्रांना बोलावले आहे. 

बातम्या आणखी आहेत...