आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त प्रियांकाच्या नाही तर भारतातील अजून एका गोष्टीच्या प्रेमात पडला निक जोनास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : प्रियांका चोप्राने गेल्या शनिवारी मुंबईमध्ये बॉयफ्रेंड निक जोनाससोबत साखरपुडा केला. यावेळी तिने कुटूंबीय, फ्रेंड्स आणि काही खास जवळच्या लोकांना पार्टीत बोलावले होते. पार्टीमध्ये जास्तीत जास्त पंजाबी डिशेज होत्या. परंतू मेनूमध्ये बटर चिकन स्पेशल ठेवण्यात आले होते. याचे खास कारण म्हणजे प्रियांकाचा होणारा नवरा निकला ही भारतीय डिश खुप आवडली. जेव्हापासून प्रियांकाला हे कळाले आहे, तेव्हापासून ती निकच्या जेवणात बटर चिकन देणे विसरत नाही. 

 

गोवा हॉलिडेलाही प्रियांकाने शेफला स्पेशली सांगितले होते 
जूनमध्ये निक जोनास भारतात आला होता तेव्हा प्रियांका त्याला फिरवण्यासाठी गोव्यात घेऊन गेली होती. येथेही तिने निकची आवड लक्षात घेऊन हॉटेलच्या शेफला स्पेशल बटर चिकन बनवण्यास सांगितले होते. निक जोनासला बटर चिकनसोबतच दाल मखनी खुप आवडते. तर प्रियांकाला मक्क्याची भाकरी आणि सरसोचा साग खुप आवडतो. 

 

प्रियांकाचा टॅटू बनवणार निक 
निक विदेशी असला तरी तो मनाने स्वतःला पंजाबी मानतोय. निक हळुहळू इंडियन कल्चर शिकतोय. यासोबतच साखरपुड्यात त्याने सर्व ट्रॅडिशन पॉलो केले. निक लवकरच आपल्या बॉडीवर प्रियांकाचा टॅटू गोंदवणार आहे असे बोलले जातेय. 

बातम्या आणखी आहेत...