आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. निक लग्नासाठी काही दिवसांपूर्वीच भारतात आला. जोधपूर येथे प्रियांका आणि निक विवाहबद्ध होणार आहेत. निक आणि प्रियांकाच्या लग्नासाठी आता निकचे कुटुंबीयही भारतात येत आहेत. प्रियांकाचे होणारे दीर जो जोनास आणि जाऊ सोफी टर्नर भारतात पोहोचले आहेत. सोफी टर्नरला 'गेम ऑफ थ्रोन्स'साठी ओळखले जाते. निकसोबत प्रियांका तिच्या दीर-जाऊला रिसिव्ह करण्यासाठी विमानतळावर पोहोचली होती. सासरच्या मंडळींच्या स्वागतासाठी प्रियांकाने डिनर पार्टीचे आयोजन केले होते.
यांची होती उपस्थिती : पार्टीत निकची मेहुणी आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि मेहुणा सिद्धार्थ चोप्रा सामिल झाले होते. याशिवाय या पार्टीत आलिया भट, सोनाली बेंद्रेची नणंद सृष्टी बहल, राइटर मुश्ताक शेख हे देखील पोहोचले होते. पार्टीतून निघताना प्रियांकाची दीर-जाऊसोबत चांगली बाँडिंग बघायला मिळाली.
थोडी काळजीत दिसली प्रियांका : प्रियांका सोमवारी संध्याकाळी तिच्या मुंबईतील ऑफिसबाहेर दिसली. यावेळी ती थोडी काळजीत वाटली. रफ लूक जीन्स, टी-शर्टमध्ये असलेल्या प्रियांकाने यावेळी पैपराजीकडे दुर्लक्ष केले आणि कारमध्ये जाऊन बसली. यावेळी तिने फोटोग्राफरला पोज दिली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.