आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Chopra Nick Jonas Unseen Wedding Photos Nick Getting Trolled For The Making Fun Of Religion

निक जोनासच्या मेंदीचा फोटो व्हायरल, हातावर ज्या अंदाजात प्रियांका चोप्राचे नाव लिहिले, ते वाचून भडकले सोशल मीडिया यूजर्स, एकाने लिहिले - प्रियांका देवी नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः सोशल मीडियावर निक जोनासचा एक फोटो व्हायरल होत असून हा फोटो त्याच्या लग्नातील मेंदीचा आहे. त्याने आपल्या हातावर मेंदीने "ॐ प्रियंकाय नमः" असे लिहून घेतले होते. त्याखाली स्वतःच्या नावाचे आद्याक्षर 'N' लिहिले होते. 1 डिसेंबर रोजी निक आणि प्रियांकाचे लग्न पार पडले. त्यांच्या लग्नानंतर हा समोर आलेला अनसीन फोटोे आहे. काही सोशल मीडिया यूजर्स निकच्या या फोटोचे कौतुक करत आहेत, तर काहींनी मात्र रोष व्यक्त केला आहे. 


प्रियांकाला देवीचा दर्जा दिल्याने भडले सोशल मीडिया यूजर्स...  

- एका सोशल मीडिया यूजरने लिहिले, "माणसाला देव बनवले, त्यात काय चांगुलपणा..." आणखी एका यूजरने लिहिले "प्रियांका एखादी देवी नाही." एका यूजरने तर निकसाठी गाढव हा शब्दप्रयोग केला आहे. त्याने लिहिले,"धर्माची थट्टा मांडून ठेवली आहे... गाढवा."  26 वर्षीय अमेरिकन गायक असलेल्या निक जोनासने 1 डिसेंबर रोजी ख्रिश्चन आणि 2 डिसेंबर रोजी हिंदू पद्धतीने प्रियांकासोबत लग्न थाटले. जोधपूर येथील प्रसिद्ध उम्मेद भवन पॅलेसमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर 4 डिसेंबर रोजी नवी दिल्लीत त्यांचे वेडिंग रिसेप्शन झाले. त्यानंतर 20 डिसेंबर रोजी प्रियांकाने बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी मुंबईत रिसेप्शन होस्ट केले होते.

 

प्रियांका आणि निकच्या लग्नाचे अनसीन फोटोज समोर आले आहेत, ते तुम्ही पुढील स्लाईड्सवर बघू शकता...  

बातम्या आणखी आहेत...