आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाची तयारी सुरू असताना शुटिंगसाठी दिल्लीत पोहचली प्रियांका चोपडा, तोंडाला मास्क लावून काम करताना दिसला फरहान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- प्रियांका चोपरा आणि निक जोनस या दोघांचे लग्न डिसेंबरमध्ये होणार आहे. परंतू प्रियांका तिच्या वर्क कमिटमेंटमुळे लग्नाची तयारी करत असताना तिची आगामी फिल्म 'द स्काय इज पिंक' ची शुटिंगसुद्धा करत आहे. सध्या ती दिल्लीचे शेड्यूल पुर्ण करत असून यादरम्यान इंस्टाग्रामवर तिने एक फोटो शेअर केला आहे. तर दुसरीकडे फिल्मचा अॅक्टर फरहान यानेही एक फोटो शेअर केला आहे. फोटोत दोघेजणांनी तोंडाला मास्क लावलेला दिसत आहे.

 

आयशाची बायोग्राफी

>  द स्काय इज पिंक हा बायोपिक मोटिवेशनल स्पीकर आयशा चौधरी आणि तिच्या कुटूंबियांची यांच्या जिवनावर आधारीत आहे. या बायोपिकचे दिग्दर्शन सोनाली बोस करणार आहे. आयशा 13 वर्षांची असताना तिला पल्मोनरी फ्राइब्रोसिस नावाचा आजार झाला असताना तिने तिच्या संघर्षावर एक पुस्तक लिहले होते. त्यानंतर 18 व्या वर्षीच तिचा मृत्यू झाला होता. 

 

2 डिसेंबरला प्रियांका आणि निक जोनस करणार लग्न

2 डिसेंबरला हॉलीवुड सिंगर निक जोनस आणि प्रियंका यांचे लग्न जोधपूरच्या उम्मेद पॅलेसमध्ये होणार आहे. प्रियंका आणि निकचे लग्न ख्रिश्चन आणि हिंदू परंपरेनुसार होणार आहे. आता मागिल काही दिवसांपूर्वी प्रियंका आणि निक हे एका बॅचलरेट पार्टीमध्ये बॅचलर लाइफ एन्जॉय करताना दिसले होते तेव्हा त्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

 

बातम्या आणखी आहेत...