आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांका चोप्राने बॉलिवूड सेलिब्रिटींना वगळून या हॉलिवूड अॅक्टरला दिले लग्नाचे आमंत्रण, केले आहे चॉपर बुक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत प्रियांका येत्या 2 आणि 3 डिसेंबर रोजी जोधपूर येथे सप्तपदी घेणार आहे. हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने दोघांचे लग्न लागणार आहे. प्रियांकाने लग्नात बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रित केलेले नाही. पण तिने एका खास हॉलिवूड अॅक्टरला मात्र आवर्जुन लग्नाचे निमंत्रण दिले आहे.


प्रियांकाने हॉलिवूडच्या एकमेव अभिनेत्याला लग्नासाठी आमंत्रित केले असून या हॉलिवूड अभिनेत्याचे नाव आहे  ड्वेन जॉनसन उर्फ द रॉक. लवकरच ड्वेन प्रियांका-निकच्या लग्नासाठी जोधपूर येथे दाखल होणार आहे. प्रियांका आणि ड्वेन यांनी बेवॉच या हॉलिवूड चित्रपटात एकत्र काम केले होते. तर जुमांजी या चित्रपटात ड्वेन निक जोनाससोबत झळकला होता. प्रियांकाने ड्वेनसाठी हेलिकॉप्टर बुक केले आहे.

 

आईसोबत परफॉर्म करणार प्रियांका... 
प्रियांका तिच्या लग्नाच्या संगीत सेरेमनीत आई मधू चोप्रासोबत धमाकेदार परफॉर्मन्स देणार आहे. दोघी एका स्पेशल गाण्यावर नृत्य करणार आहे. प्रियांका तिचा भावी पती निकसोबतही परफॉर्म करणार आहे. संगीत सेरेमनीची कोरिओग्राफी कोरिओग्राफर गणेश हेगडे करत आहे.

- रिपोर्ट्सनुसार, निकने संगीत सेरेमनी खास बनवण्यासाठी स्पेशल प्लानिंग केले आहे. निक हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स करणार आहे. तो प्रियांकाच्या चित्रपटातील गाणी 'गल्ला गुडियां..', 'देसी गर्ल..' 'पिंगा..'  या गाण्यांवर परफॉर्मन्स देणार आहे. निक हिंदी गाणी गाणारदेखील आहे. तो त्याच्या ट्रूपसोबत 45 मिनिटांचे सादरीकरण करणार आहे.

 

80 गेस्ट होणार सहभागी
- निकयांकाच्या लग्नात फ्रेंड्स आणि फॅमिली मिळून एकुण 80 पाहुणे सहभागी होणार आहेत. लग्नात प्रियांकाने बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रित केलेले नाही. 
- लग्नानंतर निकयांका 2 रिसेप्शन देणार आहेत. एक रिसेप्शनल 4 डिसेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. तर मुंबईतही एक रिसेप्शन असून यात बॉलिवूडचे सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. अद्याप मुंबईत होणा-या रिसेप्शनची तारीख जाहिर करण्यात आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...