Home | Gossip | Priyanka Chopra Mother And Mother In Law Dance Video

प्रियांका चोप्राच्या आईने त्यांच्या विहीणबाईंना शिकवला पंजाबी डान्स, बघा रोका सेरेमनीचा Unseen Video

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 29, 2018, 03:26 PM IST

प्रियांकाच्या घरी पार पडलेल्या रोका सेरेमनीचा एक अनसीन व्हिडिओ समोर आला आहे.

  • बॉलिवूड डेस्क- बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा याच महिन्यात 18 ऑगस्ट रोजी अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत साखरपुडा झाला. या खास कार्यक्रमासाठी निक त्याच्या आईवडिलांसोबत मुंबईत आला होता. प्रियांकाच्या घरी पार पडलेल्या रोका सेरेमनीचा एक अनसीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा या निकची आई डेनिस जोनास यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहेत. व्हिडिओत मधू त्यांच्या विहीणबाई डेनिस यांना पंजाबी गाण्यावर डान्स स्टेप्स शिकवताना दिसत आहेत. दोघीही एकमेकींची कंपनी एन्जॉय करताना या व्हिडिओत दिसत आहेत. प्रिंयांका-निक यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात जोनास फॅमिली इंडियन आउटफिटमध्ये दिसली होती.

Trending