आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​प्रियांकाच्या आई म्हणाल्या- जोधपुर खुप आवडते शहर यामुळे सर्व जग सोडून मुलीचे लग्न येथे करणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. प्रियांका चोप्राच्या आई डॉ. मधु चोप्रा शुक्रवारी लग्नाच्या तयारींसाठी जोधपुरमध्ये पोहोचल्या होत्या. जोधपुर एयपोर्टमधून निघताना प्रियांकाच्या आईचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये त्या म्हणत आहेत की, जोधपुर त्यांचे आवडते शहर आहे. यामुळे संपुर्ण जग सोडून ते आपल्या मुलीचे या ठिकाणी लग्न करत आहेत

दीप-वीरप्रमाणे सीक्रेट नसेल लग्न 
व्हिडिओमध्ये प्रियांकाची आई म्हणत आहेत की, तुम्ही लग्न पाहून घ्या, आतापासून आम्ही काय सांगणार. यावरुन कळते की, प्रियांका आणि निकचे लग्न दीपिका रणवीरप्रमाणे सीक्रेट वेडिंग नसेल. या लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओच पाहण्यासाठी चाहत्यांना दिर्घकाळ प्रतिक्षा करावी लागणार नाही. 


असे केले फायनल 
उम्मेद भवन पॅलेसला वेडिंग डेस्टिनेशन फायनल करण्यासाठी प्रियांका आणि निक 2 अक्टोबरला चार्टर प्लेनने डायरेक्ट जोधपुरला गेले होते. त्यांनी येथे अनेक व्यवस्था पाहिली. पण रुम कमी असल्यामुळे त्यावेळी डेस्टिनेशन फायनल होऊ शकले नव्हते. यानंतर प्रियांकाने जोधपुरमध्ये लग्न करण्याचे फायनल केले आणि ताज ग्रुपला ही जबाबदारी सोपवली.

बातम्या आणखी आहेत...